ETV Bharat / state

मुंबई : सोमवारपासून फास्ट टॅग अनिवार्य; नियंमाचे उल्लंघन केल्यास शुल्क आकारणार - mumbai fast tag news compulsory

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने निर्णय घेतला आहे, राष्ट्रीय महामार्गावरील फी प्लाझामधील सर्व लेन 15/16 फेब्रुवारी 2021च्या मध्यरात्रीपासून 'फी प्लाझाची फास्ट टॅग लेन' म्हणून घोषित करण्यात येतील.

fast tag news mumbai
फास्ट टॅग बातमी मुंबई
author img

By

Published : Feb 14, 2021, 9:12 PM IST

मुंबई - टोल नाक्यावर वाहनांची कोंडी टाळण्यासाठी आता उद्या (सोमवारी) 16 फेब्रुवारीपासून वाहनांवर फास्ट टॅगला अनिवार्य असणार आहे. आता मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

फास्ट टॅग नसल्यास दुप्पट शुल्क आकारणार -

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने निर्णय घेतला आहे, राष्ट्रीय महामार्गावरील फी प्लाझामधील सर्व लेन 15/16 फेब्रुवारी 2021च्या मध्यरात्रीपासून 'फी प्लाझाची फास्ट टॅग लेन' म्हणून घोषित करण्यात येतील. त्यामुळे एनएच शुल्क अधिनियम 2008नुसार फास्ट टॅग लेनमध्ये प्रवेश करणारे फस्ट टॅग न बसवलेले कोणतेही वाहन किंवा वैध, कार्यरत फास्ट टॅगशिवाय प्रवेश करणाऱ्या वाहनांना त्या श्रेणीस लागू असलेल्या शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल.

हेही वाचा - महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठीही तयारी ठेवा - छगन भुजबळ

फास्ट टॅग बसवणे अनिवार्य -

रविवारी जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाने स्पष्ट केले आहे, डिजिटल पद्धतीने फी भरायला चालना देण्यासाठी, प्रतिक्षा वेळ आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी आणि फी प्लाझामधून विनाव्यत्यय प्रवास करता यावा, यासाठी हे केले गेले आहे. मंत्रालयाने 1 जानेवारी 2021पासून मोटार वाहनांच्या एम अँड एन प्रवर्गात फास्ट टॅग बसवणे अनिवार्य केले होते. प्रवर्ग 'एम' म्हणजे प्रवासी वाहतूक करणारे कमीतकमी चार चाकी मोटर वाहन आणि 'एन' मालवाहतूक करणारे किमान चारचाकी वाहन जे सामानाबरोबरच माणसांनाही घेऊन जाऊ शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.