ETV Bharat / state

'सरासरीपेक्षा कमी पाऊस असलेल्या तालुक्यात शेतकऱ्याने पेरणी करू नये' - dada bhuse appeal farmers over sow

तसेच राज्यात कमी पडलेल्या सरासरी पावसामुळे यावेळी खरीप हंगामाची पेरणी केवळ 39 टक्के एवढीच झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवसात सरासरी 62 टक्के पेरणी झाली आहे. पेरणी धीम्या गतीने सुरू आहे. नाशिक, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात पाऊस कमी असल्याची माहितीही दादा भुसे यांनी दिली.

dada bhuse
दादा भुसे
author img

By

Published : Jun 29, 2021, 7:37 PM IST

मुंबई - राज्यात ज्या तालुक्यांमध्ये सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडलेला आहे, अशा तालुक्यांमध्ये अजूनही शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. तसेच सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेल्या तालुक्यांमध्ये पेरणी केली असता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले. 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासोबत विशेष संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

ईटीव्ही भारत प्रतिनिधीने कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी साधलेला संवाद

गेल्या वर्षी 62 टक्के पेरणी -

तसेच राज्यात कमी पडलेल्या सरासरी पावसामुळे यावेळी खरीप हंगामाची पेरणी केवळ 39 टक्के एवढीच झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवसात सरासरी 62 टक्के पेरणी झाली आहे. पेरणी धीम्या गतीने सुरू आहे. नाशिक, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात पाऊस कमी असल्याची माहितीही दादा भुसे यांनी दिली.

हेही वाचा - राज्यात पावसाची शक्यता; कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुढील ४८ तासांत समाधानकारक पाऊस

राज्यात दुबार पेरणीचे संकट नाही -

सध्या राज्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असलेला तालुका केवळ एक आहे. तर 25 ते 50 टक्के दरम्यान सरासरी पाऊस झालेले तालुके 9 आहेत. तसेच 50 ते 75 टक्के दरम्यान 18 तालुक्यांमध्ये पाऊस झाला आहे. 75 ते 100 टक्के पाऊस झालेले तालुके 35 आहेत. तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या 292 एवढी आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यामध्ये कोठेही दोबार पेरणीचं संकट नाही.

खतांचा पुरवठा -

राज्यात बियाणांचा, रासायनिक खतांचा पुरेसा साठा आहे. सोयाबीन मध्यप्रदेशातून येत आहे. सुरूवातीला त्यांनी महाराष्ट्राला न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्यानंतर याबाबत आता सकारात्मक बाब दिसून येत आहे. महाबीजचे बियाण्याचे दर चालू वर्षाला कमी ठेवले आहेत. यामुळे इतर कमी कंपन्यांचे दर जास्त आहे, ही वस्तूस्थिती आहे. तसेच राज्यात सर्व ठिकाणी खतांचा पुरवठा केला जात आहे. अद्याप कोणत्याही तालुक्यातून खतांबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे कृषी मंत्र्यांकडून सांगण्यात आले.

आता सोयाबीनचा महाबीजचा पुरवठा 10 टक्के क्वांटिटी आहे. पुढच्या वर्षी 20 टक्के पुरवठा करता येईल, असे नियोजन करात येईल. पुढच्या वर्षी सोयाबीन, कांदा आणि इतर वान जास्त स्वरुपात पुरवठा करण्यात येईल, असेही ते म्हणाले. जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करु नका, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच संबंधित तालुक्यातील अधिकाऱ्यांनाही याबाबत सूचना देण्यात आले आहे. आतापर्यंत दुबार पेरणीचे संकट आलेले नाही, ही समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्र्यांना जो वेधशाळेने माहिती दिली, त्यानंतर त्यांनी कृषी विभागाला आदेश दिले. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा - केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात पावसाळी अधिवेशनात ठराव करावा - राजू शेट्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.