ETV Bharat / state

एकीकडे कोरोनाचं संकट तर दुसरीकडे राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनाने खरीपापुढे अंधार... - कोरोना आणि खरीप हंगाम

राज्यात अनेक ठिकाणी वाहतूक बंद असल्याने खतपाणी बियाण्यांच्या वाहतुकीमध्ये ही अडचणी आहेत त्यामुळे मागणी नोंदवूनही पुरवठा झालेला नाही. धोरणामुळे वाहतुकीला मर्यादा असल्याने भाजीपाल्याचे दर पडले आहेत शहराकडे होणारी वाहतूक देखील मंदावली आहे. राज्यातील अनेक भागातून यामुळे पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची लाट आली आहे. त्यामुळेच सोयाबीन आणि मक्या बियाण्याची मागणी वाढल्याचे शेतकरी निलेश घुले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनाने खरीपापुढे अंधार

author img

By

Published : May 15, 2020, 4:01 PM IST

Updated : May 15, 2020, 7:59 PM IST

मुंबई - राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या खरीप हंगाम दरवर्षी नियोजनाने ठरतो. खरीपाच्या तोंडावर कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव आणि कृषी विभागाची यंत्रणा कोरोनाच्या नियंत्रणात गुंतल्याने खते बियाणे आणि बदलत्या पीक पद्धती नियोजनाबाबत कृषी विभाग ढिम्म आहे. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणीची लगबग सुरू झाल्यावर निविष्ठा खरेदीसाठी शारीरिक अंतराचा फज्जा आणि काळ्याबाजाराला उत येणार असल्याचे निश्चितपणे मानले जात आहे.

राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनाने खरीपापुढे अंधार...

कोरोनाच्या संकटाने जगभरामध्ये धुमाकूळ घातला आहे. देशात आणि राज्यात परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असली तरी आगामी काळातील अन्नसुरक्षेचे संकट लक्षात घेऊन शेतीव्यवसायाला अत्यावश्यक सेवा म्हणून लॉकडाऊन मधून सूट देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी आदेश काढून कृषी विभागाचे सर्व यंत्रणा खरिपाच्या नियोजनात गुंतवावी, असे स्पष्ट आदेश असताना ठिकठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून कृषी विभागाची यंत्रणा करण्याच्या कामात आजपर्यंत गुंतून ठेवली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी वाहतूक बंद असल्याने खतपाणी बियाण्यांच्या वाहतुकीमध्ये ही अडचणी आहेत त्यामुळे मागणी नोंदवूनही पुरवठा झालेला नाही. धोरणामुळे वाहतुकीला मर्यादा असल्याने भाजीपाल्याचे दर पडले आहेत शहराकडे होणारी वाहतूक देखील मंदावली आहे. राज्यातील अनेक भागातून यामुळे पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची लाट आली आहे. त्यामुळेच सोयाबीन आणि मक्या बियाण्याची मागणी वाढल्याचे शेतकरी निलेश घुले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

गाव पातळीवर काम करत असलेल्या कृषी सहाय्यकच्या माध्यमातून या क्षणाला बियाणे आणि खतांची मागणी नोंदवून आवश्यकता किती आहे, याचा अंदाज घेणे अभिप्रेत असताना कृषी विभागाची ग्रामपातळीवरील यंत्रणा सर्व कोरोनाच्या कामात गुंतल्याने नियोजनामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग बंद असताना शेतीकडे सर्वजण एक मोठी अपेक्षा घेऊन पाहत आहे. कारण, भारतीय शेतीतील सर्वात मोठा ग्राहक हा शेतकरी व शेतीच आहे. सर्व जगातील बलाढ्य कंपन्या भारतात फक्त आपला उत्पादन विकतात. आजही शेती आणि शेतकरी यांना 20 लाख कोटीतून किती मिळाले, याचा तर हिशोबच लागत नाही.

खरिपासाठी आवश्यक युरिया काही मोठा तुटवडा असल्याचे किसान सभेचे नेते अजित नवले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा - बहराईचमध्ये स्थलांतरीत मजूरांच्या ट्रकला अपघात; दोन ठार

खरीप 2020 चे भवितव्य काय असेल?

कोरोना शेतीतील पीक पध्द्ती नक्कीच बदलणार आहे. मात्र, त्या अनुषंगाने येत्या खरीप हंगामात काय बदल होणार?, शेतकरी बदलते नियोजन काय करणार? शेतकऱ्याच्या बदलत्या नियोजनाचा अंदाज कृषी विभाग कृषी विद्यापीठे किंवा शेतीतील खाजगी कंपन्या यांनी काही घेतला आहे का? याबाबतचे कृषी विभाग आणि इतर कृषी निविष्ठाबाबत बियाणे खते कीटकनाशके तणनाशके यांच्या पुरवठाधोरण तसेच कृषी विद्यापीठे हा होणारा बदलाचा काही अंदाज तरी घेताहेत का? असा सवाल शेतकरी अजित कोरडे म्हणाले.

येणारा खरीप पीक नियोजनात आमूलाग्र बदल घडवेल. पीक पध्द्ती बदलेल. कोरोनामुळे शेतकरी नक्कीच विचार करणार आणि मग भाजीपाला पिके कमी होतील किंवा त्यात बदल होतील. तसेच टोमॅटोवरील विषाणूमुळे टोमॅटो लागवडीवर निश्चितच परिणाम होणार, असे अनेक मुद्दे आहेत. त्यावर सरकारने तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे, अशी मागणी शेतकरी अभ्यासक दिपक चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. सोयाबीन महाराष्ट्रात खूप मोठे क्षेत्र आहे. मागील वर्षी नेमका काढणीच्यावेळी झालेला परतीचा मान्सूनमुळे सोयाबीन भिजले आणि सडले. त्यामुळे यावर्षी बियाण्याची गुणवत्ता नक्कीच नसणार, तसेच उगवणक्षमताही कमीच होणार आहे. त्यामुळे दर्जाहीन सोयाबीन बियाणेमुळे खूप मोठा परिणाम होणारच, जसे उगवण कमी म्हणून उत्पादन कमी पण खर्च वाढणार आहे.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार, बियाणे तुटवडा येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचे बियाणे वापरावे यासाठी प्रचार चालू केला. मात्र, तो प्रचार शेतकऱ्यांपर्यंत पोहचवू शकत नाही. कारण, कृषी सहायक हा खरा घटक अजूनही कोरोनाच्या आपत्कालीन कामात गुंतून ठेवला आहे, असे डॉ. नवले म्हणाले. एप्रिल, मे पासून मका पिकाची लागवड वाढत आहे आणि येत्या खरिपात मका बियाणे तुटवडा भासवून लूट होणार तसेच मकाचे क्षेत्र वाढत असताना प्रशासन मात्र सुस्त आहे. उन्हाळ्यात मका पिकासाठी युरियाची फार मोठी कमतरता आली तशीच युरियाची कमतरता खरिपात तर खूपच येणार आहे. कारण बदलती पिके तसेच युरिआ सोबत इतर औषध खतांची साखळी मार्केटिंग ही शेतकऱ्यांसाठी खूप घातक होणार आहे.

हेही वाचा - आर्थिक पॅकेजच्या तिसऱ्या टप्प्याची केंद्रीय अर्थमंत्री आज करणार घोषणा

300 रुपयाच्या युरियाची गरज असताना शेतकऱ्याला दुसरे खते किंवा औषध खरेदी करायला लावून ही लूट वाढणारच आहे, असे कमोडीटी विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांनी सांगितले. खरीप नियोजनाच्या दृष्टीने कृषी विभागाच्या आदेशाने अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणात धरसोड वृत्ती दिसून येत आहे. त्यामुळे बीटी बियाण्यांची एक मेपासून अपेक्षित असलेली बीटी बियाण्यांची विक्री एक जून पर्यंत लांबवली आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जूनच्या पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना खते बियाणे मिळवण्यासाठी आर्थिक तडजोड करुन तारांबळ होणार आहे. याच दरम्यान कोरोनाच्या नियंत्रणासाठी आवश्यक शारीरिक आंतर त्या जोडीला पुरवठा कमी असल्याने काळाबाजाराला सामोरे जावे लागणार आहे.

तणनाशके आणि कीटकनाशके यांचा कृत्रिम तुटवडा भासूनही लूट होणारच आहे. तरी आतापासूनच जर शासनाने जागरूकता दाखवली तर ही वेळ निश्चितच टळेल आणि या बिनभरवशाच्या काळात भरोशाची शेतीच राज्याला पुन्हा समृद्ध करेल, असा विश्वास असतानाही कृषी विभागाचे दुर्लक्ष होते काय? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. कृषिमंत्र्यांनी दादा भुसे यांच्या घोषणा आणि आदेशाला कृषी विभाग आतूनच हरताळ फासल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. कृषिमंत्र्यांच्या स्थानिक मतदारसंघ असलेल्या मालेगाव मध्ये करण्याचा प्रादुर्भाव असल्याने त्यांनी स्वतः मौनव्रत ते करून पूजेमध्ये तासनतास खर्च केल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कृषीमंत्री आता तरी जागे होऊन कास्तकार याला आगामी खरिपासाठी मदतगार म्हणून उभे राहतील, अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे.

Last Updated : May 15, 2020, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.