ETV Bharat / state

Fake Message To Ashish Shelar : आशिष शेलार यांना लोन सेटलमेंटसाठी फेक मेसेज, गुन्हा दाखल

Fake Message To Ashish Shelar : आमदार आशिष शेलार यांच्या मोबाईलवर फेक मेसेज करणाऱ्या अज्ञात भामट्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार आशिष शेलार यांना लोन सेटलमेंट करुन देण्याच्या नावानं त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न अज्ञात भामट्यानं केला आहे.

Fake Message To Ashish Shelar
आमदार आशिष शेलार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 10:11 AM IST

Updated : Sep 1, 2023, 10:40 AM IST

मुंबई : भाजपाचे आमदार आशिष शेलार यांना लोन सेटलमेंट करण्यासाठी अज्ञान भामट्यानं फेक मेसेज पाठवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आमदार आशिष शेलार यांचे स्वीय सहायक नवनाथ सातपुते यांनी अज्ञात आरीपविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष शेलार यांना फेक मेसेज : भाजपचे आमदार आशिष शेलार यांना एका अज्ञात भामट्यानं लोन सेटलमेंट करण्यासाठी फेक मेसेज पाठवला आहे. या भामट्यानं आमदार आशिष शेलार यांचं लोन सेटलमेंट करुन देण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमदार आशिष शेलार यांच्या वतीनं त्यांचे स्वीय सहायक नवनाथ सातपुते यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात भामट्याविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार शेलार यांना एका भामट्यानं खोटा संदेश मोबाईलवर पाठवला होता. मात्र तो मेसेज फेक असल्याचं आशिष शेलार यांनी लगेच ओळखलं आणि 29 ऑगस्टला वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

काय आहे फेक मेसेजचं प्रकरण : आमदार आशिष शेलार यांचे स्वीय सहायक नवनाथ सातपुते यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार 27 ऑगस्टला सकाळी 9.19 वाजता आमदार आशिष शेलार यांना मेसेज आला होता. यात 'CP-FINVFR, प्रिय महेश अनंत लातूरकर, तुमचे, फिनफ्रेंड्स कर्ज 200216802 बंद करा, फक्त रुपये भरा. https://rzp.io/i/igWzL6ce आता आणि सेटलमेंट लेटर मिळवा. 04069243000 Finfriends ला पैसे दिले असल्यास दुर्लक्ष करा.' लिंक ओपन केल्यावर आमदार शेलार यांना आणखी एक मेसेज दिसला. यात 'कर्ज बंद करणे अपेक्षित असेल तर 7 हजार 700 भरायचे आहेत.' मात्र, आमदार आशिष शेलार यांनी कर्ज घेतलं नव्हतं. दरम्यान, आमदार आशिष शेलार यांना 9820120105 आणि 04069243000 या क्रमांकावरून दोन वेळा फेक फोन कॉल आले आणि त्यांनी कर्जाची रक्कम भरण्याची विनंती केल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

वांद्रे पोलीस करत आहेत कसून तपास : आमदार आशिष शेलार हे सध्या महायुतीच्या बैठकीत व्यस्त आहेत. अशातही त्यांना फेक मेसेज पाठवून फसवणुकीचा प्रयत्न केल्यानं त्यांनी याबाबत तक्रार देण्याचं ठरवलं. आमदार आशिष शेलार यांच्या स्वीय सहायकानं त्यांच्या वतीनं तक्रार दाखल केली. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यांच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनं दिली आहे. वांद्रे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेलं नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा :

  1. Shivendraraje Bhosale : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं फेसबुक पेज हॅक; सायबर सेलकडे तक्रार दाखल
  2. Threaten To Prasad Lad : अनोळखी व्यक्तीकडून जीवाला धोका; भाजपा आमदार प्रसाद लाड यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

Last Updated : Sep 1, 2023, 10:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.