ETV Bharat / state

गाडी विकण्याची बनावट जाहिरात देऊन माटुंग्यातील व्यक्तीला लावला 6 लाखांचा चुना - गाडी विकण्याची बनावट जाहिरात देऊन माटुंग्यातील व्यक्तीला लावला 6 लाखांचा चूना

राजस्थान येथील आरिफ शेख याने स्वतःला लष्करातील अधिकारी सांगून चारचाकी गाडी सहा लाख रुपयांना तत्काळ विकायची आहे, अशी बनावट जाहिरात ऑनलाईन दिली होती.

fake-advertisement-for-selling-a-car-6-lacks-fraud-mumbai
गाडी विकण्याची बनावट जाहिरात देऊन माटुंग्यातील व्यक्तीला लावला 6 लाखांचा चूनागाडी विकण्याची बनावट जाहिरात देऊन माटुंग्यातील व्यक्तीला लावला 6 लाखांचा चूना
author img

By

Published : Dec 17, 2019, 7:31 PM IST

मुंबई- येथील माटुंगा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला ऑनलाईन गाडीची बनावट जाहिरात देऊन सहा लाखांचा गंडा घातला आहे. सेलूकुमार सेविअर असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. माटुंगा पोलीस ठाण्याच्या सायबर सेल पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली आहे.

गाडी विकण्याची बनावट जाहिरात देऊन माटुंग्यातील व्यक्तीला लावला 6 लाखांचा चूना

हेही वाचा- प्रियकराचे गुप्तांग कापल्याप्रकरणी तरुणीला १० वर्षांची शिक्षा

राजस्थान येथील आरिफ शेख याने स्वतःला लष्करातील अधिकारी सांगून चारचाकी गाडी सहा लाख रुपयांना तत्काळ विकायची आहे, अशी बनावट जाहिरात ऑनलाईन दिली होती. त्यानुसार तक्रारदार सेलूकुमार यांनी गाडी घेण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. या वेळी आरोपी आरिफ शेख याने आपण लष्करातील अधिकारी असून आपल्याला पेटीएमच्या माध्यमातून तत्काळ पैसे हवे असल्याचे सांगितले. त्यानुसार सेलूकुमार यांनी पैसे दिले. मात्र, सहा लाख रुपये देऊनही गाडी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपास करत राजस्थान मधील भरतपूर जिल्ह्यातील पहाडी तालुक्यातून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Intro:ओएलएक्सवर महिंद्रा स्कॉर्पिओ विकण्याची बनावट
जाहिरात देऊन मुंबईतील माटुंगा परिसरात राहणाऱ्या पीडित तक्रारदार सेलूकुमार सेविअर यांना सहा लाखांना लुटणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या माटुंगा पोलिस ठाण्याच्या सायबर सेल पोलिसांनी तांत्रिक तपास करत अटक केलेली आहे. Body:राजस्थान मध्ये राहणारा आरिफ शेख हा भामटा स्वतःला लष्करातील अधिकारी असून त्याच्या जवळ असलेली महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी ही त्याला सहा लाख रुपयांना तात्काळ विकायची आहे अशी बनावट जाहिरात ओएलएक्सवर दिली होती. त्यानुसार माटुंगा परिसरातील पीडित तक्रारदाराने आरोपी अरेफ शेख याच्या वाटस आप क्रमांकावर संपर्क साधून सदर आपण गाडी घेण्यात विकत घेण्यास इच्छुक असल्याचे सांगितला होत. या वेळी आरोपी आरिफ शेख याने आपण लष्करातील अधिकारी असून आपल्याला पेटीएम च्या माध्यमातून तात्काळ पैसे हवे असल्याचे त्याने पीडित तक्रारदाराला सांगितला होत. आरिफ शेख याने वाटस आप वर सादर केलेली गाडीची बनावट कागदपत्रे पाहून विश्वास बसलेल्या तक्रारदाराने त्याच्या अकाऊंटमध्ये तब्बल सहा लाख रुपये भरले होते. मात्र सहा लाख रुपये देऊनही गाडी मिळत नसल्यामुळे आपण फसले गेल्याच लक्षात आल्यानंतर पीडित तक्रारदाराने मुंबईच्या माटुंगा पोलिसांकडे 6 जुलै 2019 रोजी तक्रार दाखल केली.Conclusion:आरोपीने तो पकडला जाऊ नये म्हणून पीडित तक्रारदाराला संपर्क साधण्यासाठी त्याच्या मोबाईल फोन मध्ये व्हाट्सअप बिझनेस इन्स्टॉल करून घेतला होता . ज्यामुळे त्याचा मोबाईल क्रमांक ट्रेस करणे पोलिसांना कठीण जात होते मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास करत राजस्थान मधील भरतपूर जिल्ह्यातील पहाडी तालुक्यातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

( बाईट - सौरभ त्रिपाठी , डीसीपी )

( रेडी टू एअर पॅकेज जोडले आहे.)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.