मुंबई : अनेक महिला नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी कॉपर टी सारख्या इतर गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करतात. मात्र, ही पद्धत अपयशी ठरताना दिसत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने माहितीच्या अधिकाराखाली दिलेल्या अहवालावरून दररोज जवळपास ७१ महिलांचा गर्भपात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बऱ्याच कुटुंबांमध्ये कुटुंब नियोजनासाठी महापालिका स्थानिक पातळीवर, उपक्रम राबवत असते. या उपक्रमांमध्ये नसबंदीपासून आमच्या कॉपरटी पासून पर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात येतो. मात्र, पती-पत्नी आर्थिक समतोल साधत ठराविक आपत्तीनंतर मूल जन्मास टाळण्यासाठी गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करतात.
26 हजार 80 महिलांचा गर्भपात : महिला गर्भनिरोधकासाठी ज्या गोष्टींचा वापर करतात त्याचा फायदा मात्र होताना दिसत नाही आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी बृहन्मुंबई महापालिकाकडे गर्भपाताची माहिती मागवली होती. यावर दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी 2022 मध्ये 26 हजार 80 महिलांना गर्भनिरोधक अपयशी गर्भपात करावा लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक महिला नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी कल्पनेरोधक गोळ्या अथवा कॉपर टी सारख्या अनेक पर्यायाचा अवलंब करतात. मात्र, त्याचा परिणाम दिसून येत नसल्याचे या आकडेवारीवरून चित्र स्पष्ट होत आहे. गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक पद्धती वापरू नये. त्याचा फायदा होत नसल्याने महिलांमध्ये काळजीचे वातावरण पाहायला मिळते.
गर्भनिरोध पद्धती दोन प्रकारे वापरली जाते : स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर तुषार पालवे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, गर्भनिरोध पद्धती दोन प्रकारे वापरली जाते. एक नॅचरल दुसरी आर्टिफिशियल पद्धतीने वापर केला जातो. बरीचशी जोडपे नॅचरल कॉन्ट्रासेप्शन पद्धतीचा वापर करतात. या पद्धतीत महिलेच्या मासिक पाळीच्या आधी दहा दिवस किंवा मासिक पाळीच्या नंतरच्या दहा दिवसात रिलेशन ठेवले तर, विनाकॉन्ट्रासेपशन बहुतेकवेळा गर्भधारणा होत नाही. त्यामुळे हा सुरक्षित कालावधी असल्याचे डॉक्टर तुषार पालवे यांनी सांगितले. महापालिकेच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार गर्भपाताच्या विश्लेषणातून गर्भनिरोध घेतल्यानंतरही महिला गर्भवती राहिल्या असे समोर आले आहे. 2022 मध्ये झालेल्या 30 हजार 92 गर्भपातांपैकी 87 टक्क्यांहून अधिक गर्भपात गर्भनिरोधक पद्धत अयशस्वी ठरल्यामुळे झाल्या आहेत.