ETV Bharat / state

फेसबुकवरची मैत्री पडली 32 लाखांना, नायजेरियन आरोपीला अटक - ई-मेल

मात्र, बऱ्याच वेळा पैसे परत करण्याची मागणी करूनही सदर महिलेकडून उत्तर मिळत नसल्याने तक्रारदार आबासाहेब यांनी ई-मेल करून पैशांची मागणी केली. यावर संबंधित महिलेने आपला युके मधील तिचा एक माणूस मुंबईत येऊन पैसे देईल, असे सांगितले.

आरोपीस पकडून वांद्रे पोलीस ठाण्यात आणले.
author img

By

Published : Jun 10, 2019, 10:03 PM IST

मुंबई - फेसबुक सारख्या समाज माध्यमावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी पीडिताला 32 लाखांचा गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीतील एका व्यक्तीला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे.

फेसबुकवरची मैत्री पडली 32 लाखांना, नायजेरियन आरोपीला अटक

या प्रकरणातील अहमदनगर येथील पीडित तक्रादार आबासाहेब भोये यांची फेसबुकवर सिल्व्हाना लिडियन या महिलेशी मैत्री झाली होती. काही दिवस ते एकमेकांच्या संपर्कात होते. सिल्व्हाना या महिलेने पीडित तक्रारदार यांना तिचे काही पार्सल मुंबई विमानतळावर कस्टममध्ये अडकून पडले असून ते सोडविण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. यावर विश्वास ठेवून पीडित तक्रारदार यांनी या महिलेला बऱ्याच वेळा तिने दिलेल्या अकाउंटमध्ये साडे आठ लाख रुपये टप्याटप्याने दिले होते. मात्र, बऱ्याच वेळा पैसे परत करण्याची मागणी करूनही सदर महिलेकडून उत्तर मिळत नसल्याने तक्रारदार आबासाहेब यांनी ई-मेल करून पैशांची मागणी केली. यावर संबंधित महिलेने आपला युके मधील तिचा एक माणूस मुंबईत येऊन पैसे देईल, असे सांगितले.

ठरल्याप्रमाणे आबासाहेब यांना ओरफॉ युले (वय 35) याने फोन करून मुंबईत भेटण्यासाठी बोलाविले. पीडित तक्रारदार यांना आरोपी ओरफॉ याने त्याच्याकडे एक विशिष्ठ प्रकारचे केमिकल होते. या केमिकलने जुन्या नोटा स्वच्छ तर होतात तर सध्या पेपरचे रूपांतर डॉलरमध्ये होत असल्याचे सांगितले. हे केमिकल हवे असल्यास एका लिटरसाठी 16 लाख रुपये लागतील असे सांगितले. यावर शंका आल्याने पीडित तक्रारदार यांनी वांद्रे पोलिसांना तक्रार केली असता पोलिसांनी सापळा रचून आरोपी ओरफॉ युले यास अटक केली आहे.

Intro:फेसबुक सारख्या सोशल माध्यमावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी पीडिताला 32 लाखांचा गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीतील एका व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या बांद्रा पोलिसांनी अटक केली आहे.
Body:या प्रकरणातील अहमद नगर येथील पीडित तक्रादार आबासाहेब भोये यांची फेसबुक वर सिल्व्हाना लिडियन या महिलेशी मैत्री झाली होती. काही दिवस एकमेकांच्या संपर्कात राहिल्यावर सिल्व्हाना या महिलेने पीडित तक्रारदार आबासाहेब यांना तिचे काही पार्सल मुंबई विमानतळावर कस्टम मध्ये अडकून पडले असून ते सोडविण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. यावर विश्वास ठेवून पीडित तक्रादार यांनी या महिलेला बऱ्याच वेळा तिने दिलेल्या अकाउंट मध्ये साडे आठ लाख रुपये टप्याटप्याने दिले होते. मात्र बऱ्याच वेळा पैसे परत करण्याची मागणी करूनही सदर महिलेकडून उत्तर न मिळत असल्याने तक्रादार आबासाहेब यांनी ई मेल करून पैशांची मागणी केली. यावर संबंधित महिलेने आपला युके मधील तिचा एक माणूस मुंबईत येऊन पैसे देईल असे सांगितले. Conclusion:ठरल्याप्रमाणे आबासाहेब यांना ओरफॉ युले (35) याने फोन करून मुंबईत भेटण्यासाठी बोलाविले असता , पीडित तक्रारदार यांना आरोपी ओरफॉ याने त्याच्याकडे एक विशिष्ठ प्रकारचे केमिकल असून या केमिकल ने जुन्या नोटा स्वच्छ तर होतात मात्र सध्या पेपरचे रूपांतर डॉलर मध्ये होत असल्याचे सांगितले. हे केमिकल हवे असल्यास एका लिटर साठी 16 लाख रुपये लागतील असे सांगितले. यावर शंका आल्याने पीडित तक्रारदार यांनी बांद्रा पोलिसांना तक्रार केली असता पोलिसांनी सापळा रचून आरोपी ओरफॉ युले यास अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.