मुंबई : भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत मुंबईतील सर्व शाळांना गुरुवारी सुटी देण्यात आली आहे.
गरज असेल तरच घराबाहेर पडा : महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे. आयुक्तांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क राहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचा इशारा : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलने पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 'भारतीय हवामान खात्याने मुंबई शहर आणि उपनगरीय भागासाठी आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) जारी केला आहे,' असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुंबईत बुधवारी जोरदार पाऊस झाला : बुधवारी दुपारी 12 वाजल्यापासून शहरातील विविध भागात जोरदार ते मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरात सरासरी 76.45 मिमी पाऊस झाला होता. मुंबईच्या पूर्व उपनगरात सरासरी 58.01 मिमी पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरात 70.43 मिमी पाऊस झाला. हवामान खात्याने जारी केलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रशासनाने यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवारपर्यंत सुट्टी जाहीर केली होती. या पावसाळ्यात जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 64 टक्के पाऊस झाला आहे. बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 24 तासांच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरी 104 मिमी पाऊस झाला. या कालावधीत महाड तालुक्यात सर्वाधिक 145 मिमी, तर अलिबाग तालुक्यात सर्वात कमी 45 मिमी पाऊस झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
-
भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या…
">भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 26, 2023
या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या…भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 26, 2023
या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या…
हेही वाचा :
- Thane Rain Update: तानसा धरण ओव्हरफ्लो, सात दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
- Kolhapur Rain Update: राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीत विसर्ग सुरू; पंचगंगेची पाणी पातळी वाढणार
- Ajit Pawar Meeating: अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर काम करा - अजित पवार यांचे निर्देश