ETV Bharat / state

D Company Terror Funding Case : सलीम फ्रुटसह दोन आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; डी कंपनी टेरर फंडींगप्रकरण

author img

By

Published : Dec 14, 2022, 6:13 PM IST

मुंबई बाॅम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आणि अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहीम टेरर फंडींग प्रकरणात अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात ( Terror Funding Case have been Remanded in Judicial Custody ) आली आहे. सलीम फ्रुटसह ( NIA Files Charge Sheet in Court in Terror Funding Case ) एकूण तिन्ही आरोपींना 29 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ( Salim Fruit Along with The Other Two Accused ) ठेवण्यात येणार आहे.

D Company Terror Funding Case
सलीम फ्रुटसह दोन आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; डी कंपनी टेरर फंडींगप्रकरण

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टेरर फंडिंग प्रकरणात अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने सलीम फ्रुटसह इतर दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली ( Terror Funding Case have been Remanded in Judicial Custody ) आहे. सर्व ( Bombay Sessions Court Extended Judicial Custody of Salim Fruit ) आरोपींची 29 डिसेंबरपर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या ( NIA Files Charge Sheet in Court in Terror Funding Case ) प्रकरणात आरोपी सलीम फ्रुटसह इतर दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी वाढ ( Salim Fruit Along with The Other Two Accused ) करण्यात आली आहे.

टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएकडून कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल : टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएने कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. अनेक पुरा इलेक्ट्रॉनिक पुराव्यासह एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, या प्रकरणातील दोन फरार आरोपी म्हणून दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांना आरोपपत्रात दाखवण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने मे महिन्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कारवायांना मुंबईतून पैसा पुरवण्यात येत असल्याच्या आरोपाखाली छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुट, आरिफ अबुबकर शेख आणि शब्बीर अबुबकर शेख यांना अटक करण्यात आले होते.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी कारवायांकरिता पैसा पुरवला जायचा : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी कारवायांकरिता मुंबईतून मोठ्या व्यवसायिकांकडून तसेच अनधिकृत फ्लॅट विक्रीच्या व्यवसायातून जमा केलेले रक्कम ही दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीला देण्यात येत असे. या पैशांतून दाऊद इब्राहिम दहशतवादी कारवाया करण्याकरिता उपयोग करीत असे, असा दावा एनआयएने केला होता.

एनआयएकडून मोठी छापेमारी : एनआयएकडून छापेमारी करण्यात आली होती. छापेमारीदरम्यान एनआयएला अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले. त्यानंतर 18 लोकांची एनआयएकडून सलग तिसऱ्या दिवशीदेखील चौकशी करण्यात आली होती. गुरुवारी या प्रकरणात एनआयएकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली. बेकायदेशीर कारवाया आणि दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवणे हा सहभाग होता, असे एनआयएकडून सांगण्यात आले आहे.

एनआयएकडून सोमवारी आणि मंगळवारी मुंबई परिसरात जवळपास 29 ठिकाणांवर छापे : राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी आणि मंगळवारी मुंबई परिसरात जवळपास 29 ठिकाणांवर छापे टाकले. हे सर्व छापे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तांवर टाकण्यात आले होते. एनआयएने या सर्व व्यक्तींची झाडाझडती घेतली होती व त्यांची कसून चौकशी केली. यावेळी एनआयएने अनेक महत्त्वाचे पुरावेही जप्त केले होते. या प्रकरणी मुंबईतील एनआयए मुख्यालयात सुमारे 18 सदस्यांची चौकशी करण्यात आली आहे.

तिसऱ्या दिवशी मुंबईतील एनआयए मुख्यालयात सुमारे 18 जणांची चौकशी : एनआयएकडून चौकशीच्या थेट तिसऱ्या दिवशी मुंबईतील एनआयए मुख्यालयात सुमारे 18 सदस्यांची चौकशी करण्यात आली. या सर्वांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. काही जणांना घरी सोडले तर काही जण अजूनही एनआयए ऑफिसलाच आहेत. 18 जणांमध्ये सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट, माहीम आणि हाजी दर्ग्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुहेल खंडवानी, अजय गोसालिया, गुड्डू पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, समीर हिंगोरिया, कय्युम शेख, आरिफ शेख आदींचा समावेश आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून फेब्रुवारीमध्ये दाऊदसंबंधित प्रकरणांचा तपास एनआयएकडे : दाऊद इब्राहीमशी संबंधित प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये एनआयएकडे सोपवला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे डी कंपनी आणि दाऊद इब्राहीम भारतात टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्ज स्मगलिंग आणि बनावट चलनाचा वापर करण्याचे काम करीत आहे. दाऊद इब्राहीम आणि डी-कंपनी लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदा यांच्या माध्यमातून भारतात अतिरेकी कायवाया करीत असल्याचेही गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे. एनआयए फक्त दाऊद इब्राहीम आणि डी-कंपनीचीच चौकशी करणार नाहीये, तर छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इकबाल मिर्ची, दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्याशी संबंधित घटनांचाही तपास करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.