ETV Bharat / state

राज्य सरकारला कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिली होती; राजभवनाकडून स्पष्टीकरण

author img

By

Published : Feb 11, 2021, 3:46 PM IST

राज्य सरकारने राज्यपालांच्या विमान प्रवासाला परवानगी नाकारल्यानंतर राजभवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राज्य सरकारला राज्यपालांच्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिली होती, असे त्यांनी म्हटले आहे.

explanation-from-raj-bhavan-on-governor-air-travel-issue
राज्य सरकारला कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिली होती; राजभवनाकडून स्पष्टीकरण

मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उत्तराखंड दौऱ्याची राज्य सरकारला पूर्वकल्पना दिली होती. तरीही राज्य सरकारने राज्यपालांना विमान प्रवास नाकारल्यानंतर राजभवनाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राज्य सरकारला राज्यपालांच्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिली होती, असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात यावरून आता राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.

राज्य सरकारला दिली होती पूर्वकल्पना -

देहराडूनमधील मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे आयएएस अधिकाऱ्यांच्या १२२ व्या प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भूषवणार आहेत. शुक्रवारी १२ फेब्रुवारी २०२१ रोजी हा कार्यक्रम होणार आहे. या नियोजित कार्यक्रमाला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आतंरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी ११ फेब्रुवारीरोजी सकाळी १० वाजता रवाना होणार होते. या संदर्भात राज्यपालांच्या सचिवांनी महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडे सरकारी विमान प्रवासाला परवानगी मिळावी, याकरिता २ फेब्रुवारीरोजी पत्रव्यवहार केला होता. पत्रानुसार राज्यपालांनी गुरुवारी विमानतळ गाठले. मात्र, सरकारी विमान प्रवासास परवानगीच नसल्याची बाब समोर आली. यानंतर राज्यात वातावरण ढवळून निघाले. राज्यपालांच्या प्रवासाला महाविकास आघाडीने जाणीवपूर्वक खोडा घातल्याच्या संतप्त प्रतिक्रिया भाजप गोटातून उमटल्या. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले. तर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी याबाबत माहीत नसल्याचे सांगत हात झटकले आहेत.

खासगी विमानाने रवाना -

राज्य सरकारने परवानगी नाकारल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी खासगी विमानाने देहराडूनला रवाना झाले. येथून उत्तराखंड येथील दुर्घटना स्थळाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी होणाऱ्या नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा - केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस डाव्या आघाडीसोबतच; मतभेद नाहीत - मुख्यमंत्री विजयन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.