ETV Bharat / state

police Recruitment: पोलीस भरतीचे स्वप्न राहिले अधुरे, भरती प्रक्रियेत धावताना माजी सैनिकाचा मृत्यू

मुंबई पोलीस दलासाठी भरती प्रक्रिया सुरु असताना मैदानी चाचणी दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सचिन कदम असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, मैदानी चाचणी सुरु असताना धवता धावता ते मैदानावरच कोसळले. त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई येथील एका मैदानावर रविवारी घडली.

Sachin Kadam Death
माजी सैनिकाचा मृत्यू
author img

By

Published : Apr 18, 2023, 10:30 AM IST

मुंबई : पोलीस भरतीसाठी धावताना कोसळून माझी सैनिक सचिन कदम 42 यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याप्रकरणी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याआधी देखील मैदानात दोघांचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला आहे. 1600 मीटर धावताना गणेश उगले आणि अमर सोलंकी या दोन पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचा मृत्यू झाला.

कल्याणमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले : मूळचे खेड तालुक्यातील दहिवली येथील रहिवासी असलेले सचिन कदम हे लष्करातून 2011 मध्ये निवृत्त झाले होते. त्यानंतर टोरंटो इलेक्ट्रिकल पावरमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. पोलीस भरतीसाठी कलिना येथील मुंबई विद्यापीठ मैदानात मैदानी चाचणीसाठी ते आले होते. 1600 मीटर धावण्यासाठी ते उतरले होते. मात्र तिसऱ्या फेरीत जमिनीवर कोसळले. त्यानंतर तात्काळ त्यांना बी एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांना घोषित करण्यात आले. तर सचिन कदम यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी एक मुलगा आणि आई असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर कल्याण येथील स्मशानभूमीत सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मैदानात धावताना कोसळून मृत्यू: दरम्यान, यापूर्वीही पोलीस भरती दरम्यान उमेदवारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. उन्हाच्या तापमानाचा पारा वाढलेला असल्यानेच धावताना भरतीसाठी आलेल्या तरुणांना चक्कर येण्याचे प्रमाण वाढले आहे. या आधी देखील 17 फेब्रुवारीला वाशीमहून पोलीस भरतीसाठी आलेल्या गणेश उगले या तरुणाचा कलीना येथील मैदानात धावताना चक्कर आल्याने खाली कोसळून मृत्यू झाला होता. तसेच अमर सोलंकी या अमरावतीच्या तरुणाचाही याच मैदानात 22 फेब्रुवारीला मृत्यू झाला होता. मुंबई पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांनी आपल्या तब्येतीची काळजी घेऊन शारीरिक चाचणीसाठी मैदानात उतरावे, असे वारंवार तज्ञांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस भरतीसाठी मुंबईत आलेल्या तरुणांपैकी तिसरा उमेदवार दगावला आहे.

हेही वाचा: Police Recruitment पोलीस भरतीमध्ये एकाच उमेदवाराने अनेक ठिकाणी अर्ज केल्याने प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.