मुंबई - संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी सोमवार दि.21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबई शहर आणि जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया निर्भय, नि:पक्ष व पारदर्शी वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक कर्मचारी तसेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे रॅण्डमायझेशन (randomization) बुधवारी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत संगणकीय प्रणालीने पूर्ण करण्यात आले.
हेही वाचा - रंगनायक चित्रपटाच्या टीजरमध्ये राहुल गांधींचा अपमान, आडनावाचा केला आक्षेपार्ह उच्चार
यामुळे मुंबई शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कोणत्या कर्मचाऱ्यास, कुठल्या विधानसभा मतदारासंघात काम करण्यास जावे लागेल, याची निश्चिती प्रशासकीय स्तरावर करण्यात आली आहे. तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभांसाठी नियुक्त करण्यात आलेले केंद्रीय निवडणूक निरीक्षक तसेच संबंधित विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमक्ष हे रॅण्डमायझेशन झाले.
यावेळी निवडणूक निरीक्षक यांनी निवडणुकीसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी, माहिला अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था, प्रवास व्यवस्था, तसेच मतदान प्रक्रिया वेळेत सुरू करण्यासाठीची घ्यावयाची काळजी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले व सुचना दिल्या.
हेही वाचा - पीएमसी बँकेचे ग्राहक हवालदिल; ग्राहक निर्मला सीतारमन यांना भेटणार
मुंबई शहर-जिल्हा निवडणूक प्रक्रियेत 17 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती -
मुंबई शहर आणि जिल्हयामध्ये 10 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघामध्ये 2 हजार 594 मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रात किमान 5 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कुमक तात्काळ उपलब्ध व्हावी. यासाठी आवश्यकतेपेक्षा किमान 10 टक्के अधिक कर्मचारी आरक्षित म्हणून कर्तव्यावर असणे गरजेचे असते. त्यानुसार मुंबई शहर जिल्हयातील दहा विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांसाठी 17 हजार कर्मचाऱ्यांचे द्वितीय सरमिसळ करण्यात आले. राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्र (एनआयसी) यांनी विकसित केलेल्या पोलिंग स्टाफ मॅनेजमेट सिस्टम या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून ही सरमिसळीची प्रक्रिया करण्यात आली. तृतीय स्तरीय सरमिसळ प्रक्रिया ही प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी करण्यात येणार आहे.