मालाड दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 'त्या' तरूणीला 14 तासानंतर बाहेर काढण्यात यश
मुंबई - मालाडमधील पिंपरी पाड्यातील भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २५ वर्षीय तरूणीला अखेर १४ तासानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या तरूणीची जगण्यासाठी झुंज सुरू आहे. संचिता नलावडे, असे ढिगाऱ्याखालून काढलेल्या तरूणीचे नाव आहे. वाचा सविस्तर...
मालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार - मुख्यमंत्री
मुंबई - मालाड दुर्घटनेला दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. शिवाय या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळून २० जणांना प्राण गमवावे लागले. याचे पडसाद विधानसभेत उमटले. यावेळी विरोधकांनी सरकारला धारेवर धरत महापालीकेवर कारवाई केली जावी अशी जोरदार मागणी केली. वाचा सविस्तर...
MUMBAI RAIN LIVE UPDATE ः लोकल सेवा लवकरच पूर्वपदावर; सीएसएमटीहून कर्जत, टिटवाळ्याकडे लोकल रवाना
मुंबई - गेल्या चार दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. ही रेल्वेसेवा आता पुन्हा एकदा पुर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे. सीएसएमटीहून ठाणे, कल्याण, बदलापूर,कर्जत आणि टिटवाळा या मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबई अडकलेल्या चाकरमान्यांना घरी जाण्यासाठी याचा फायदा होत आहे. वाचा सविस्तर...
'भैया गोरेगाव लेना', बिग बींचा मुंबई पालिकेला टोला
मुंबई - राज्यात पावसामुळे जनजीवनावर झालेल्या परिणामानंतर त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. अमिताभ बच्चन, नवाब मलिक यांच्या घरात पाणी घुसले तर गरीबांच्या झोपड्याचे काय? असा प्रश्न विधानसभेत अजित पवारांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आता अमिताभ बच्चन यांनीही एक ट्वीट करत मुंबई महापालिकेची फिरकी घेतली आहे. वाचा सविस्तर...
'बार्टीच्या धर्तीवर ओबीसी, एसबीसी, व्हीजे एनटीसाठी स्वायत्त संस्था स्थापन करणार'
मुंबई - राज्यात मराठा समाजासाठी 'सारथी' आणि मागास प्रवर्गासाठी असलेल्या 'बार्टी' या दोन्ही संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या धर्तीवर राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती, (व्ही जे एन टी), इतर मागासवर्ग (ओबीसी) व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) या प्रवर्गासाठी राज्यात एक नवीन स्वायत्त संस्था स्थापन केली जाणार आहे. याबाबतची माहिती मंत्री संजय कुटे यांनी आज विधानसभेत एका निवेदनाच्या माध्यमातून दिली. वाचा सविस्तर...