ETV Bharat / state

Nawab Malik News: नवाब मलिक यांच्याबाबत आजही सुनावणी नाहीच; तारीख पे तारीख विरोधात नवाब मलिक सुप्रीम कोर्टात - नवाब मलिक सुप्रीम कोर्टात

तारीख पे तारीख अशी म्हण प्रत्यक्षात नवाब मलिक यांच्या खटल्याचा संबंधात दिसत आहे. न्यायालयीन कामकाजामुळे आज देखील मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला. या संदर्भातली सुनावणी 6 जून रोजी न्यायालयाने निश्चित केली.

Nawab Malik News
नवाब मलिक यांच्याबाबत आजही सुनावणी नाही
author img

By

Published : May 2, 2023, 9:53 PM IST

मुंबई : टेरर फंडिंग प्रकरणांमध्ये आरोप असलेले आरोपी नवाब मलिक यांना जामीन मिळावा यासाठी, आज जामीन अर्जावर न्यायालयीन कामकाजाचा भार अधिक असल्यामुळे न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी मालिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. उच्च न्यायालयाच्या या विलंबामुळे सर्वोच्च न्यायालयात नवाब मलिक यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला व मुंबई उच्च न्यायालयाकडे जावे आणि त्यांनी जर तुम्हाला नकार दिला. तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये येऊ शकता, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नबाब मलिक यांना सांगितले.

सुनावणी घेण्यास दिला नकार: आज मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठापुढे सुनावणीची तारीख होती. परंतु न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. कारण प्रचंड न्यायालयीन खटलांचा ढीग पडलेला असल्यामुळे सहा जून रोजी याबाबतची सुनावणी निश्चित केली आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांनी न्यायालयीन कामकाज प्रचंड असल्यामुळे आज या सुनावणीसाठी नकार दिला.

ही आहे पार्श्वभूमी: नवाब मलिक यांनी जी मालमत्ता खरेदी केली आहे. ती दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून आहे. अशी मालमत्ता खरेदी करताना त्यात आर्थिक गैरव्यवहार केला गेला आहे. असा अंमलबजावणी संचलनालयाने आरोप ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. मात्र नवाब मलिक आजारी असल्यामुळे ते दवाखान्यात आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांच्यासमोर बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यापुढे खटल्यांचे ढीग पडलेले असल्यामुळे तातडीने सुनावणी घेण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये नवाब मलिक यांनी धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडे जाण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

मागील सुनावणी वेळी काय झाले: न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांनी सूचीबद्ध झालेली याचिका सुनावणीसाठी घेता येणार नाही असे, वकील अमित देसाई यांना सांगितले. त्याचे कारण देखील त्यांनी नमूद केले की, अनेक खटल्यांचा ढीग आहे. आता जी सुनावणी आलेली आहे. त्यामध्ये खूप आधीपासून ज्यांची जामीन अर्ज पडलेले आहेत. त्यांच्यावरच्या सुनावण्या सुरू आहे. त्यामुळे आज नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकत नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.

जामीन अर्जावर सुनावणी होणे जरुरी: ज्येष्ठ अधिवक्ता अमित देसाई यांनी न्यायालयाला विनंती केली होती की, पंधरा मिनिटं तरी उद्या या जामीन अर्जावर सुनावणी झाली पाहिजे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यांचे दोन्ही मूत्रपिंड रिकामे झालेले आहेत. ते अनेक महिन्यांपासून अंथरुणावर आहेत ते उपचार घेत आहेत. त्यांच्याबाबत जामीन अर्जावर सुनावणी होणे जरुरी आहे. आधी ज्या खंडपीठाकडे सुनावणी झाली. त्यानंतर खंडपीठ बदलल आणि पुन्हा या खंडपीठाकडे ही याचिका सुनावणीसाठी आली. पुन्हा पहिल्यापासून सर्व बाबी जामीन अर्जाच्या अनुषंगाने मांडाव्या लागतात त्यामध्ये खूप वेळ लागतो.

आज होती सुनावणीची तारीख: जामीन अर्जावर वेळेवर सुनावणी नाही झाली तर, न्याय मिळण्यास विलंब होतो. त्यामुळेच नबाब मलिक यांच्या आरोग्य स्थितीकडे पाहून वैद्यकीय अहवालाच्या आधारे आपण जामीन अर्जावर सुनावणी घ्यावी. अशी विनंती ज्येष्ठ अधिवक्ता अमित देसाई यांनी केली. मात्र न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी उद्या किंवा परवा या ऐवजी दोन मे रोजी याबाबत सुनावणी घेऊ. त्याचे कारण न्यायालयीन कामकाज प्रचंड असल्यामुळे दोन मे शिवाय सध्या तरी दुसरी कुठलीही तारीख नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज सुनावणीची तारीख होती. परंतु न्यायालयीन कामकाजाचा ढीग असल्यामुळे न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांनी आज ऐवजी 6 जून 2023 ही तारीख निश्चित केली.

वैद्यकीय स्थितीबाबत माहिती दिली: सुनावणी घेण्यासाठी आज जवळजवळ जेष्ठ वकील अमित देसाई यांनी नवाब मलिक यांच्या वैद्यकीय स्थितीबाबत न्यायालयाला माहिती दिली. जर त्यांना जामीन मिळाला नाही तर, त्यांना अधिक चांगले दर्जेदार उपचार मिळू शकणार नाहीत. किडनी निकामी झालेली आहे. परिणामी जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होणे आवश्यक असल्याची विनंती देखील त्यांनी न्यायालयाला केली. अखेर सहा जून 2023 या दिवशी सुनावणी करण्याचे निश्चित झाले.

हेही वाचा: Sharad Pawar Resignation माझी निवृत्ती सार्वजनिक क्षेत्रातली नाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून शरद पवारांचे शेवटचे शब्द पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.