ETV Bharat / state

पोलिसांच्या नोटीसनंतरही मनसे रेल्वे आंदोलनावर ठाम, उद्या करणार 'सविनय कायदेभंग' - मनसे आंदोलन बातमी

रेल्वे पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना नोटीस बजावली आहे. मात्र, तरीही आंदोलनावर ठाम असल्याचे संदीप देशपांडे यांचे म्हणणे आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Sep 20, 2020, 4:07 PM IST

Updated : Sep 20, 2020, 4:28 PM IST

मुंबई - मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल म्हणजेच उपविभागीय रेल्वे सेवा सुरू करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी (दि. 21 सप्टें.) 'सविनय कायदेभंग' आंदोलनाचा इशारा दिला होता. रेल्वे पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना नोटीस बजावली आहे. मात्र, नोटीस बजावल्यानंतरही मनसे हे आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

बोलताना मनसेचे सरचिटणीस देशपांडे

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना रेल्वे मुंबई रेल्वे पोलिसांनी ही नोटीस पाठवली आहे. जर नोटीसी विरोधात रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई करू, असा इशारा रेल्वे पोलिसांनी मनसेला दिला आहे .

नोटीस आली तरी आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. मुंबईत कंगना विरुद्ध आंदोलन करताना शिवसेनेच्या आंदोलनाला परवानगी मिळते. मग मनसेच्या आंदोलनाला नोटीस कशी येते याबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे. आमचे आंदोलन हे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आहे, गेले अनेक दिवस लोकल सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बससेवा सुरु आहे. पण, बसमध्ये प्रचंड हाल होत आहेत. लोकांना घरी जाण्यासाठी जवळपास आठ तास लागत आहे. लोकांचे हाल बघवत नाही. वारंवार विनंती करुनही सरकार रेल्वे सेवा सुरू करत नाही. विनंती करुन सरकार ऐकत नाही. त्यामुळे मनसेतर्फे सविनय कायदे भंग करत आम्ही रेल्वे प्रवास करणार आहे असे देशपांडे यांनी सांगितले.

हेही वाचा - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोनावर मात

Last Updated : Sep 20, 2020, 4:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.