ETV Bharat / state

आज...आत्ता...रात्री १२ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर... - night

मोदींच्या शपथविधी सोहळ्याला 'हे' नेते राहतील उपस्थित, तर 'या' नेत्यांनी फिरवली पाठ. डॉ. पायल तडवीची आत्महत्या नसून खूनच, वकिलाचा दावा. औरंगाबादेत विवाहितेला जिवंत जाळले; कारण काय तर, मुलगी झाली... क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला लंडनमध्ये दिमाखात सुरुवात...अभिमानास्पद; कल्याणची सुष्मिता सिंग बनली ‘मिस टिन वर्ल्ड’.

आज...आत्ता...रात्री १२ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...
author img

By

Published : May 29, 2019, 11:50 PM IST

मोदींच्या शपथविधी सोहळ्याला 'या' नेत्यांची राहील उपस्थिती, तर 'हे' नेते फिरवणार पाठ

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांच्या पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा उद्या (दि. ३० मे) राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला देश-विदेशातील आमंत्रित नेत्यांपैकी काहींनी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे. वाचा सविस्तर

डॉ. पायल तडवीची आत्महत्या नसून खूनच, वकिलाचा दावा
मुंबई - वैद्यकीय विद्यार्थिंनी डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. पायलने आत्महत्या केली नसून, तिचा खूनच झाला असल्याचा दावा तिच्या वकिलाने केला आहे. पायलच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याची माहिती पायलच्या वकिलाने दिली आहे. वाचा सविस्तर

औरंगाबादेत विवाहितेला जिवंत जाळले; कारण काय तर, मुलगी झाली...

औरंगाबाद - मुलगी झाल्याचा राग मनात धरून पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात घडली आहे. जळालेल्या विवाहितेचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रिया धम्मपाल शेजवळ (वय २५, रा. अंधारी, जि. औरंगाबाद) असे मृत विवाहितेचे नाव आहे. वाचा सविस्तर

क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा लंडनमध्ये दिमाखात...

लंडन - आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक २०१९ या स्पर्धेचे आज दिमाखदार सोहळ्याने उद्घाटन समारंभ पार पडला. यंदाचा क्रिकेट विश्वकरंडक इंग्लंड आणि वेल्समध्ये होत असून इंग्लंडची राजधानी लंडन येथे आज या स्पर्धेचे उद्घाटन झाले. ३० मे ते १४ जुलैपर्यंत होणाऱ्या विश्वकरंडकासाठी जगभरातून १० संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. वाचा सविस्तर

अभिमानास्पद; कल्याणची सुष्मिता सिंग बनली ‘मिस टिन वर्ल्ड’
ठाणे - कल्याणच्या तरुणीने देशवासियांसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. अमेरिकेजवळील एल सालवाडोर या देशात झालेल्या ‘मिस टिन वर्ल्ड’ 2019 सौंदर्य स्पर्धेत कल्याणच्या सुष्मिता सिंगने विजेतेपदावर आपले नाव कोरले. वाचा सविस्तर

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.