ETV Bharat / state

आज...आत्ता... शनिवार ०१ जून २०१९ रात्री १२ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या - nanded

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात नक्षलवाद्यांनी नाल्यात लपवून ठेवलेली स्फोटकं 'सी ६०' पथकातील जवानांनी जप्त केली आहेत. तर नांदड जिल्ह्यात अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली आहे. मंदिर परिसरात मांस खाल्ल्याच्या कारणावरून कामगारांना अमानुष मारहाण झाल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील भहेडी तालुक्यात घडला आहे. महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी कन्नड शिकून घ्यावी असे वक्तव्य सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल अडचणीत आले असून घोटाळ्याच्या चौकशीसाठी 'ईडी'कडून त्यांना  समन्स  बजावण्यात आला आहे.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 1, 2019, 11:55 PM IST

जवानांनी उधळला घातपाताचा कट; नक्षलवाद्यांनी नाल्यात लपवून ठेवलेली स्फोटकं जप्त

गोंदिया - नक्षलवाद्यांनी नाल्यात लपवून ठेवलेली स्फोटके 'सी ६०' पथकातील जवानांनी जप्त केली आहेत. नक्षलवाद्यांनी ही स्फोटकं सालेकसा तालुक्यातील टेकाटोला ते मुर्कडोह गावाजवळील नाल्यात लपवून ठेवली होती. ही स्फोटकं जप्त केल्याने भविष्यात होणारा मोठा घातपात जवानांनी उधळून लावला आहे.वाचा सविस्तर...

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर बलात्कार, दोघे गजाआड

नांदेड - कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यामधील आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे. मैत्रीचा गैरफायदा घेत तिघांनी महिलेवर अत्याचार केला होता. तसेच पीडितेचे अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानंतरही त्यांनी वारंवार अत्याचार केले होते.वाचा सविस्तर...

मंदिर परिसरात मांस खाल्ल्याच्या कारणावरून कामगारांना अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल

बरेली - उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील भहेडी तालुक्यात मंदिर परिसरात मांस खाल्ल्याच्या कारणावरून गोरक्षकांनी काही कामगारांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ बनवून त्यांनी तो समाजमाध्यमांवर व्हायरल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.वाचा सविस्तर...

महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी कन्नड शिकून घ्यावी; 'या' खासदाराने व्यक्त केली अपेक्षा

सोलापूर- सोलापुरातील अधिकाऱ्यांनी थोडी थोडी का होईना कन्नड शिकून घ्यावी, अशी अपेक्षा सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या कुडल संगम येथील विकास कामाच्या भूमिपूजनाच्या समारंभ प्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले. कन्नड बहुल असलेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त भाषणही कन्नड मधून होत असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी थोडी थोडी कन्नड शिकून घ्यावी असे खासदारांनी म्हटलं आहे.वाचा सविस्तर...

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल अडचणीत.. घोटाळ्याच्या चौकशीसाठी 'ईडी'कडून समन्स

नवी दिल्ली - उड्डयनमंत्री असताना झालेल्या घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी निदेशालयाकडून (ईडी) राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावले आहे. या प्रकरणी पटेल यांना ६ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.वाचा सविस्तर...

बातमी वेब मोजोवर पाठवली आहे

गडचिरोलीच्या खरीपासाठी लागणार 26 हजार क्विंटल बियाणे तर 52 हजार मेट्रीक टन खत

गडचिरोली : खरीप हंगाम तोंडावर असून शेतकरी तसेच प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी 26 हजार क्विंटल बियाणे तर 52 हजार मेट्रीक टन खत लागणार आहे. मात्र यापैकी 15 हजार क्विंटलच बियाणे महाबीजकडून प्राप्त होणार असल्याने 11 हजार क्विंटल खाजगी बियाणे वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.

यावर्षीच्या खरिप हंगामात 2 लाख 22 हजार हेक्टर क्षेत्रावर पीक लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्हयात गेल्या हंगामात 2 लाख 2 हजार 157 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.  यात सर्वाधिक 1 लाख 82 हजार 522 हेक्टर क्षेत्रावर धानाची पेरणी होती. तर कापूस 14 हजार , तूर 5 हजार 535, मका 983 हेक्टर, तीळ 328 हेक्टर आणि सोयाबीन 92 हेक्टर व कापूस 13 हजार 975 हेक्टर  अशी एकूण 115 टक्के पेरणी झाली होती.

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सोयाबीन 300 क्टिंवल, तूर 350 क्विंटल, बी. टी. कापूस 197 क्विंटल, मका 144 क्विंटल, उडीद 3 क्विंटल, तीळ एक क्विंटल या प्रमाणे एकूण 27,732 क्विंटल बियाणे या हंगामात लागणार आहे. तर  52 मेट्रीक टन खतापैकी सर्वाधिक 28025 मे. टन आवश्यकता युरिया खताची राहणार आहे.  जिल्हयात खतांची 562 दुकाने असून किटकनाशकांची 249 तर बियाणांची 336 दुकाने आहेत. 

खते व बियानांचा काळाबाजार  होवू नये यासाठी पास मशीन आणि आधार क्रमांक याची मदत घेतली जाणार आहे.  याखेरीज 13 भरारी पथकेही निर्माण करण्यात आली आहेत. मात्र यानंतरही काळाबाजार होत असल्याने कृषी विभागाला अधिक दक्ष राहावे लागणार आहे. जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान 1502.38 मिमी इतके आहे.  गेल्या खरीप हंगामात केवळ 1355.31 म्हणजे 95.93 टक्के इतका पाऊस झाला होता.  सर्वाधिक 135.10 टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात तर सर्वात कमी 74.78 टक्के पाऊस कोरची तालुका क्षेत्रात झाला होता. 
            
कापसाचे क्षेत्र वाढतेय
जिल्हयात चामोर्शी, अहेरी आणि सिरोंचा या तीन तालुक्यांमध्ये साधारणपणे सोयाबीनची लागवड होते. याचे एकूण क्षेत्र 5646 हेक्टर असले तरी गेल्या खरिप हंगामात केवळ 7 टक्के अर्थात 393 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. जिल्हयात सोयाबीनचे क्षेत्र घटत असून कापसाच्या लागवडीचे प्रमाण वेगाने वाढत आहे.  जिल्हयातील कपाशीचे एकूण क्षेत्र 4459 हेक्टर असले तरी गेल्या खरिप हंगामात 14000 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली.  हे क्षेत्र 9541 हजार हेक्टरने वाढलेले आहे. यामुळे 2019-20 च्या खरिप हंगामात 14 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर कपाशीच्या लागवडीचे नियोजन कृषी खात्याने केले आहे.
                                                
अपघात विमा योजनेचे 33 प्रस्ताव नामंजूर
शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत 2 लाख रुपयाचे विमा संरक्षण प्राप्त आहे.  2015-16 च्या खरिप हंगामापासून ही योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत 58 मंजूर प्रस्तावापोटी शेतकऱ्यांच्या वारसांना विमा रक्कम देण्यात आली आहे. तर विमा कंपनीने 33 प्रस्ताव नामंजूर केले व 27 प्रस्ताव प्रलंबित आहे.  वारसांकडे प्रलंबित प्रस्तावांची संख्या 33 आहे.
                                                       
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.