ETV Bharat / state

आज...आत्ता... सोमवारी रात्री १२ वाजे पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...

फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प, विधानसभेच्या तोंडावर होणार आश्वासनांची खैरात? राज्यातील मान्सूनचे आगमन शुक्रवारपर्यंत लांबणीवर..'वायू'चा परिणाम. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयात बॉम्ब; उडाली खळबळ. बत्ती गुल..! नागपुरातल्या २०० शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आंधारातच होणार सुरू.'अनस्टॅापेबल' शाकिब, या विश्वकरंडकात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल.

आज...आत्ता... सोमवारी रात्री १२ वाजे पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...
author img

By

Published : Jun 17, 2019, 11:50 PM IST

फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प, विधानसभेच्या तोंडावर होणार आश्वासनांची खैरात?

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प मंगळवारी विधिमंडळात सादर होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आश्वासनांची खैरात करण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

राज्यातील मान्सूनचे आगमन शुक्रवारपर्यंत लांबणीवर..'वायू'चा परिणाम

पुणे - वायु वादळाचा प्रभावानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारपर्यंत कोकण आणि गोव्यामध्ये दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भाकीत पुणे वेधशाळेच्या वतीने वर्तवण्यात आले आहे. वाचा सविस्तर

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयात बॉम्ब; उडाली खळबळ

जळगाव - राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयात बॉम्ब असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने फोनवरुन दिल्याने एकच खळबळ उडाली होती. तेव्हा बॉम्बशोधक व नाशक पथकाने महाजन यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसराची कसून तपासणी केली. मात्र, त्या ठिकाणी कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. चौकशीअंती हा खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वाचा सविस्तर

बत्ती गुल..! नागपुरातल्या २०० शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आंधारातच होणार सुरू

नागपूर - जिल्ह्यातील सरकारी शाळांना डिजिटल करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा शासनाकडून दावा केला जात आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यातील २०० जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वीज बील न भरल्यामुळे वीज नसल्याचे समोर आले आहे. यंदा 26 जूनला शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक वर्ष आंधारातच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिजिटल शाळांचे स्वप्न कसे पूर्ण याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. वाचा सविस्तर

'अनस्टॅापेबल' शाकिब, या विश्वकरंडकात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल

लंडन - आयसीसी विश्वकरंडकात २३व्या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजचा ७ गडी राखून पराभव केला. धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकिब अल हसनने दमदार फलंदाजी करत १२४ धावांची शतकी खेळी केली. तसेच या सामन्यात त्याने वनडेमध्ये ६ हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला असून अशी कामगिरी करणार तो दुसराच बांगलादेशी खेळाडू ठरला आहे. वाचा सविस्तर

Intro:बातमीला व्हिडीओ जोडले आहेत.

पनवेल

पनवेल येथील कळंबोली परिसरात असलेल्या सुधागड हायस्कुलच्या शेजारी असलेल्या मैदानावर टायमर लावलेली बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली. त्यामुळे ही वस्तू नक्की काय आहे? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. याचा तपास कळंबोली पोलीस करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
Body:याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास कळंबोलीमधल्या सुधागड हायस्कुलच्या बाजूला एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे. याठिकाणी आईस्क्रीम विक्रीसाठी असलेल्या एका हातगाडीवर एक बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवलेली तेथील सुरक्षारक्षकाला समजली. तसंच या वस्तूला टायमर देखील लावला असल्याचं दिसून आलं. थर्माकोल, प्लास्टिक आणि मेटल या वस्तूमध्ये टाकण्यात आल्याचं सुरक्षारक्षकाने सांगितलं आहे. ही बाब लागलीच तेथील सुरक्षारक्षकाने कळंबोली पोलीस स्थानकात सांगितल्यानंतर कळंबोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले.

Conclusion:याची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि बीडीडीएस दाखल झाल्यानंतर संबंधित संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली आहे. त्याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ही वस्तू बाजूलाच असलेल्या स्मृती गार्डनमध्ये नेऊन निकामी करण्याचं काम सुरू आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.