ETV Bharat / state

आज...आत्ता... रविवारी रात्री १२ वाजे पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर

मंत्रिमंडळ खातेवाटप : तावडेंसह राम शिंदेंना धक्का, विखेंचे गृहनिर्माणावर समाधान, सोमवारी IMAचा देशव्यापी संप; राज्यातील वैद्यकीय सेवेवरही होणार परिणाम, भ्रष्टाचार लपवण्यासाठीच मंत्रिमंडळात फेरबदल; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चव्हाणांची टीका, CWC २०१९ : भारत-पाक सामन्यादरम्यान झळकले 'हिंदुस्थान के दो शेर'

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 17, 2019, 12:01 AM IST

Updated : Jun 17, 2019, 12:38 AM IST

*CWC IND VS PAK live : भारताचा पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय

मॅनचेस्टर - विश्वचषकात पाकिस्तानची भारताकडून होणाऱ्या धुलाईची परंपरा या स्पर्धेतही कायम राहिली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलींच्या बॅटने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३३६ धावा केल्या. डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळविला. वाचा सविस्तर...

मंत्रिमंडळ खातेवाटप : तावडेंसह राम शिंदेंना धक्का, विखेंचे गृहनिर्माणावर समाधान

मुंबई - आज अखेर प्रलंबित असेलेला मंत्रीमंळाचा विस्तार झाला. यामध्ये १३ जणांना नव्याने संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपला १०, शिवसेनेच्या २ तर आरपीआयच्या वाट्याला १ मंत्रीपद आले आहे. खाते वाटपात तावडे आणि राम शिंदे यांना धक्का देण्यात आला आहे. त्यांच्याकडील शालेय शिक्षण आणि जलसंधारण खाते काढून घेण्यात आले आहे. वाचा सविस्तर...

सोमवारी IMAचा देशव्यापी संप; राज्यातील वैद्यकीय सेवेवरही होणार परिणाम

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) उद्या (सोमवार ता.१७) देशव्यापी बंदची हाक दिली आहे. डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी ही माहिती दिली.वाचा सविस्तर...

भ्रष्टाचार लपवण्यासाठीच मंत्रिमंडळात फेरबदल; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चव्हाणांची टीका

मुंबई -
राज्यात मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत सरकारच्या अनेक मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला आहे. त्याबरोबरच सरकारला राज्यातील जनतेच्या विकासासाठी आलेले अपयश झाकता आले नाही. म्हणूनच त्यांनी आज आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल केले असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.वाचा सविस्तर...

CWC २०१९ : भारत-पाक सामन्यादरम्यान झळकले 'हिंदुस्थान के दो शेर'

ठाणे - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील महामुकाबला समजला जाणारा भारत विरुध्द पाकिस्तान सामना सध्या सुरू आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी भारतासह ठाणेकरही इंग्लडच्या मँन्चेस्टर येथे दाखल झाले आहेत. मैदानावरच ठाण्यातील प्रेक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेला भगवा फडकवला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर झळकावले. महत्वाचे म्हणजे, ठाण्यातील दिवा येथील प्रेक्षक आगरी-कोळी टोपी परिधान करत मैदानावर सामन्याचा आनंद घेत आहेत. वाचा सविस्तर...

Intro:Body:

dummy

Conclusion:
Last Updated : Jun 17, 2019, 12:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.