मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडेना, मुख्यमंत्री पुन्हा दिल्ली दरबारी
मुंबई - पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि भाजप प्रदेशाध्यक्षांची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मुख्यमंत्र्यांना यासाठी मुहूर्तच सापडेना अशी स्तिथी निर्माण झाली आहे. यासंदर्भात चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्ली वारी करणार असल्याची माहिती मिळते आहे.वाचा सविस्तर...
महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता IIT-JEE Advanced परीक्षेत देशात पहिला
मुंबई- आयआयटीमार्फत घेण्यात आलेल्या आयआटी- जेईई अॅडव्हान्स-2019 च्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता हा विद्यार्थी देशात पहिला आला आहे. सतरा वर्षीय कार्तिकेय याने ३६० पैकी ३३७ गुण मिळवले आहेत. या परीक्षेत अलहाबादचा हिमांशू सिंह याने दुसरा तर नवी दिल्लीतील अर्चित बुबना याने तिसरा क्रमांक मिळवला आहे.वाचा सविस्तर...
अन् धुळ्यात वादळी वाऱ्यासोबत हवेत उडू लागल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्या, व्हिडिओ व्हायरल
धुळे - शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. धुळे एमआयडीसीमध्ये पाण्याच्या रिकाम्या टाक्या वादळाच्या वेगामुळे उडत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून वादळाची तीव्रता लक्षात येते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.वाचा सविस्तर...
संतापजनक..! भिवंडीत काकाचा आठ वर्षीय पुतणीवर, तर आईच्या प्रियकराचा बारा वर्षीय मुलीवर अत्याचार
ठाणे - अल्पवयीन मुलींसह महिलांवरील अत्याचारात दिवसागणिक वाढ होत आहे. शासनाने कठोर कायदे केल्यानंतरही सातत्याने या घटना घडतच आहेत. भिवंडी शहरात देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. शहरातील एका आठ वर्षीय सख्ख्या पुतणीवर काकानेच अत्याचार केला आहे. तर दुसऱ्या घटनेत आईच्या प्रियकराने तिच्या बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या दोन्ही धक्कादायक घटनांमुळे भिवंडी शहरात एकच खळबळ उडाली आहे.वाचा सविस्तर...
संगणक हॅक करता येऊ शकतो, तर मग ईव्हीएम का नाही ? - उदयनराजे
उस्मानाबाद - लोकशाही टिकवण्यासाठी बॅलेट पेपरची मागणी होते आहे. ती मागणी मान्य व्हायला हवी. ईव्हीएम मशीन आळशी मतदारांसाठी आहे. ईव्हीएम मशीन कुणी बनवले ? माणसानेच ना..! ज्या प्रमाणे संगणक हॅक करता येवू शकते, मग ईव्हीएम का करता येणार नाही. असा उपरोधिक सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.वाचा सविस्तर...