नितेश राणेंची दादागिरी; उपअभियंत्याला पुलाला बांधून घातली चिखलाची अंघोळ
सिंधुदुर्ग - आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांशी पुन्हा एकदा दादागिरीचा केल्याचा प्रकार समोर आला आहे. कणकवलीमध्ये चिखलमय झालेल्या रस्त्याचा जाब विचारताना नितेश यांनी महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना अरेरावी करत दमदाटी आणि शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करत अधिकाऱ्याला चक्क चिखलाच्या पाण्याने आंघोळ देखील घातली. त्यामुळे एखाद्या आमदाराला अधिकाऱ्याशी, असे वर्तन करण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाचा सविस्तर...
राजू शेट्टींनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, मनसेला महाआघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध मावळेल
मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. वाचा सविस्तर...
वंचितच्या 'कथनी' आणि 'करणी'मध्ये फरक, तरीही आघाडी करण्यास तयार - विजय वडेट्टीवार
नागपूर - वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससाठी केवळ 40 जागा सोडणार असल्याचे बुधवारी जाहीर केल्याने, काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे. त्यावर आज वंचितच्या कथनी आणि करणीमध्ये मोठा फरक असल्याचा, आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मात्र, तरीही वंचितसोबत आघाडी करण्यास तयार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. वाचा सविस्तर...
महाजनांच्या मतदारसंघात प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा; ढालगाव ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषदेत भरवली शाळा
जळगाव - जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. जामनेर तालुक्यातील ढालगाव जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत १५ दिवसांपासून एकही शिक्षक हजर नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन थेट जिल्हा परिषद गाठली. यावेळी जिल्हा परिषदेच्या आवारातच शाळा भरवण्यात आली. वाचा सविस्तर...
आकाशाप्रमाणेच स्वप्नांनाही सीमा नसते, 'मिशन मंगल'वर अक्षयने लिहिली पोस्ट
मुंबई - अनेक सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता अक्षय कुमार लवकरच एका सत्य घटनेवर आधारित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिशन मंगल असं या चित्रपटाचं नाव असून यात भारताच्या मंगल मोहिमेची खरी कथा मांडली जाणार आहे. वाचा सविस्तर...