तेलंगणा : टीआरएस कार्यकर्त्यांची गुंडगिरी, पोलिसांना काठ्यांनी मारहाण
हैदराबाद - तेलंगणातील कोमारा भीम असीफाबाद जिल्ह्यात टीआरएसच्या (तेलंगाना राष्ट्रीय समिती) कार्यकर्त्यांची गुंडगिरी पाहायला मिळाली. त्यांनी पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना काठ्यांनी जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात एक महिला पोलीस जखमी झाली आहे. या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. वाचा सविस्तर...
...म्हणून मनसैनिकांनी 'त्या' अधिकऱ्यांना बांधले जगबुडी नदीच्या पुलाला
रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर खेडमध्ये असणाऱ्या जगबुडी पुलशेजारी नवीन पूल बांधण्यात आला आहे. मात्र या नवीन पुलाच्या जोडरस्त्याला मोठे भगदाड पडले असून ठिकठिकाणी हा जोडरस्ता खचला आहे. त्यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निकृष्ट कामाला महामार्गाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. आणि चक्क अधिकाऱ्यांनाच पुलाला बांधण्यात आले. सध्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वाचा सविस्तर...
आज महाराज असते तर उद्धव ठाकरेंना... निलेश राणेंचा निशाणा
मुंबई - माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांकडे उद्धव ठाकरेंसारखे मावळे असते तर महाराज यशस्वी झाले नसते. महाराजांनी उद्धव ठाकरेंना टक मक टोकावरून फेकून दिले असते, असे ट्विट करत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष केले आहे. वाचा सविस्तर...
कोंढवा दुर्घटना : बांधकाम व्यावसायिकांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
पुणे - कोंढव्यातील अल्कान स्टायलश या सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अल्कान स्टायलश सोसायटीची इमारत बांधणाऱ्या विकासक अग्रवाल बंधूसह आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील विपुल आणि विवेक अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकांना कोंढवा पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. त्यांना आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सुनावणीनंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस रामदिन यांनी २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वाचा सविस्तर...
बैलजोडीला पालखीरथ ओढण्याचा मान मिळणे म्हणजे साक्षात 'विठ्ठला'ची सेवा
यंदा संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखीरथ ओढण्याचा मान पंडीत रानवडे यांच्या सर्जा-राजा बैलजोडीला मिळाला आहे. तर संत तुकाराम महाराजांचा पालखीरथ ओढण्याचा मान पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील शेतकरी रविंद्र कोंढारे पाटील यांच्या सोन्या-सुंदर या बैलजोडीसा मिळाला आहे. आमच्या बैलजोडीला पालखीरथ ओढण्याचा मान मिळाल्याने साक्षात विठ्ठलाची सेवा करण्याची संधी मिळाल्याच्या भावना बैलांच्या मालकांनी व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर...