मै नरेंद्र दामोदरदास मोदी...' नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ
पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी आज सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेतील. यावेळी, बिस्मटेकमधील देशांच्या प्रमुखांसह एकूण 8 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यात एकून 24 कॅबिनेट तर, 33 केंद्रीय राज्यमंत्र्यांनी पदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. वाचा सविस्तर..
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सात चेहरे, सेनेची एका मंत्रीपदावर बोळवण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात, हजारो मान्यवरांसमोर हा शपथविधी सोहळा रंगला होता. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात नंतर सुरू झालेल्या कार्यक्रमात एकूण ५८ नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यामधून महाराष्ट्रातील सात नेत्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. नितीन गडकरी, पियुष गोयल, रावसाहेब दानवे, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, अरविंद सावंत, संजय धोत्रे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.वाचा सविस्तर...
नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातून 'हे' चेहरे गायब
१७ व्या लोकसभेच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज पार पडला. यामध्ये आज ५८ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये २०१४ मध्ये मंत्री असलेल्या अनेक नेत्यांना डच्चू मिळाला आहे. तर अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.वाचा सविस्तर...
नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ २.० : ..अशी आहे मोदींची नवी टीम इंडिया
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्लीतील नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज दिमाखात पार पडला. यावेळी ८ हजार जण या कार्यक्रमाला उपस्थित होते. नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर त्यांच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मंत्र्यांना शपथ दिली. वाचा सविस्तर...
पंतप्रधान मोदींच्या मातोश्री खुश.. टीव्हीवरून पाहिला केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी
लोकसभेत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींनी आज दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी इतर नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन पटेल यांनी अहमदाबाद येथील त्यांच्या राहत्या घरी टीव्हीवर हा सोहळा पहिला. वाचा सविस्तर..