मोदी, शाह यांच्यात तब्बल ५ तास चर्चा; मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ५ तास चर्चा केली. वाचा सविस्तर...
७२ वर्षीय नवीन पटनाईक सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री, शपथविधीला बहीण गीता मेहताही होत्या उपस्थित
भुवनेश्वर - ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांनी त्यांना शपथ दिली. लाल यांनी त्यांना रविवारी सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते. त्यांच्यासह २० आमदारही मंत्रीपदाची शपथ घेतील. राज्यपालांनी पटनाईक यांना ११ कॅबिनेट मंत्री आणि ९ राज्यमंत्र्यांचे मंत्रीमंडळ तयार करावे, असे सुचवले आहे. शपथविधीवेळी पटनाईक यांच्या भगिनी लेखक गीता मेहता उपस्थित होत्या. वाचा सविस्तर...
पीक कर्ज वाटपाचे आव्हान : मुख्यमंत्री घेणार बँकांची झाडाझडती
मुंबई - पीक कर्ज वाटपासाठी आग्रह धरूनही चालढकल केल्यामुळे गत वर्षात केवळ ५४ टक्के कर्ज वाटपाचे 'टार्गेट' पूर्ण झाले आहे. राष्ट्रीयकृत बँकांचा पीक कर्ज वाटपातील असहकार आणि दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना रब्बी हंगामात बँकांकडून नवीन पीककर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी कर्जाची फेररचना करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आज यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बँकर्स समितीची बैठक होणार आहे. वाचा सविस्तर...
गच्चीवर खेळताना विजेचा धक्का लागून चिमुकल्या बहीण-भावाचा जागीच मृत्यू
रायगड - कर्जत शहरामध्ये गवंडी गल्ली येथे रात्री घराच्या गच्चीवर खेळत असताना दोन चिमुकल्यांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आर्यन विनय कुमार निषाद (वय ७) आणि जान्हवी विनय कुमार निषाद (वय ३), अशी या बहीण भावांची नावे आहेत. वाचा सविस्तर...
धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींच्या घरी दिली भेट, शेट्टींच्या आईचे घेतले आशीर्वाद
कोल्हापूर - हातकणंगले मतदारसंघाचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी थेट राजू शेट्टींच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत असे कधीही पाहायला मिळाले नाही. पण ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्याच घरी जाऊन थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याच्या एका वेगळ्या परंपरेचा पायंडा या लोकसभा मतदारसंघात पडला आहे. वाचा सविस्तर...