ETV Bharat / state

प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह परिसरात नवीन लसीकरण केंद्राची स्थापना - किशोरी पेडणेकर

मुंबई महानगर पालिकेकडून शहरात विविध ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. नुकतेच बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या परिसरात नवीन लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.

प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह परिसरात नवीन लसीकरण केंद्राची स्थापना

author img

By

Published : May 26, 2021, 10:47 PM IST

मुंबई - मुंबई महानगर पालिकेकडून शहरात विविध ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रांची संख्या आणखी वाढविण्यासाठी मनपा सातत्याने प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या परिसरात लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचे ऑनलाइन माध्यमातून लोकार्पण करण्यात आले. मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार विलास पोतनीस, मनीषा चौधरी, यांच्यासह परिसरातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

'लसीचा तुडवडा लवकर सुटेल'

लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई मनपाने 'ग्लोबल टेंडर' काढत लस आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईकरांना लवकरच कोविड प्रतिबंधक लस देण्यात येईल. मनपाच्या या 'ग्लोबल टेंडर'ला एकूण 8 कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, असे असले तरी मनपाने या टेंडर प्रक्रियेला (1 जून 2021) पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

'५० टक्के लसीकरण होत नाही तोपर्यंत लोकल ट्रेन नाही'

५० टक्के लसीकरण होत नाही तोपर्यंत लोकल ट्रेन सुरू करता येणे शक्य वाटत नाही. सध्या लसीकरण केंद्राच्या धोरणामुळे अडचणी आहेत. केंद्राने धोरण तयार न केल्याने लस खरेदी करणे कठीण झाले आहे. असे मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीच यावेळी सांगितले.

हेही वाचा - Cyclone Yaas LIVE Updates : बंगाल-ओडिशामध्ये चार बळी; सुमारे २० लाख लोकांचे स्थलांतर..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.