ETV Bharat / state

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे हाल; 'बेस्ट'कडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याची तक्रार - जादा बसेस सोडण्याची मागणी

कामावर जायला आणि माघारी घरी परतण्यासाठी वेळेबर बस उपलब्ध होत नसल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. वेळेवर जादा बस सोडण्याची मागणी त्यांनी केली आहे.

workers waiting for bus
बसची वाट पाहणारे कर्मचारी
author img

By

Published : May 13, 2020, 8:38 AM IST

मुंबई- घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर असा प्रवास करताना अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. ये जा करण्यासाठी बेस्ट बसेसची व्यवस्था केली गेली आहे. या बसेसच वेळापत्रकानुसार धावत नसल्याने कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी वडाळा आगाराबाहेर सुमारे दोन तास त्यांना ताटकळत उभे राहावे लागले. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. कामाचा ताण आणि घरी पोचण्यासाठी लागणारा वेळ यामुळे कर्मचारी रडकुंडीला आले होते.

अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी विरार आणि बोरीवली येथून प्रवास करतात. यासाठी पहाटे 4 वाजता घर सोडतात. बसेस वेळेवर नसल्याने कार्यालयात पोहचण्यासाठी 4.30 तास वेळ लागतो. येताना ही तेवढाच वेळ लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास होत आहे. मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. 2 तासापासून वडाळा डेपो येथे प्रतीक्षा करून सुद्धा बस न आल्याने कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर बस सोडण्यात आली. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून काम करत आहोत परंतु आम्हाला ये जा करण्यासाठी असणारी व्यवस्था सुधारावी, जादा बसेस सोडाव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

आम्ही दररोज विरार ते छत्रपती शिवाजी टर्मिनस असा प्रवास करतो मात्र यासाठी मोठा विलंब लागतो. मंत्रालयाकडे जाणाऱ्या बसमध्ये जागा खाली असताना आम्हाला घेतले जात नाही. ही मंत्रालयाची बस असून मंत्रालयात काम करणारे कर्मचारी बसणार असे सांगितले जाते. हे चुकीचे आहे, अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

आम्ही आमची ड्युटी संपून घरी निघालो असता जाण्यासाठी बस नव्हती. जेव्हा आम्ही वडाळा डेपो येथील कर्मचाऱ्यांना विचारले असता आम्हाला उडवा उडवीचे उत्तर देण्यात आली. आम्हाला अशी वागणूक देणे योग्य नाही. दोन तासानंतर आम्हाला बसची व्यवस्था करण्यात आली पण त्यात ही सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते, असे एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.