मुंबई : 'डेट गॉन राँग' सीझन २ ही लॉकडाऊन दरम्यान प्रेमाच्या शोधात निघालेल्या एका व्यक्तींची गोष्ट आहे. ही मजेशीर मालिका ‘इरॉस नाऊ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ७ जुलैपासून स्ट्रीम होणार आहे. अभिषेक शर्मा आणि भक्ती मणियार यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. तर करण रावल याने या सिरिजचं दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात संपूर्णपणे घरात शूट झालेल्या या वेबसीरीजमधून प्रेक्षकांना व्हर्च्युअल डेटिंग आणि त्याचे परिणाम पहायला मिळतील.
भारतातील डेटिंग संस्कृती नवीन युगातील डेटिंग तंत्रांशी जुळवून घेत, लॉकडाऊन दरम्यान संपूर्णपणे घरच्या घरी शूट केलेला शो हा खर्या प्रेमाच्या शोधात असणाऱ्या दोन माणसांना एकत्र आणतो. स्थिर नातेसंबंधाच्या शोधात, एकट्याने आयुष्य जगणारे लोक व्हर्च्युअल डेटिंगचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या संवादामधून समोर येणारे अनपेक्षित परिणाम आणि कथानकाची अभूतपूर्व वळणे कथानकातली मजा वाढवत जातात. त्यामुळे 'डेट गॉन राँग'- २ प्रेक्षकांना एका मजेशीर प्रवासावर घेऊन जाईल, यात शंका नाही. व्हर्च्युअल डेटिंगच्या आभासी जगाची चाचपणी आणि हलक्या फुलक्या विनोदी पद्धतीची मांडणी पाहणं प्रेक्षकांसाठी मोठं मनोरंजक असेल.
इरॉस इंटरनॅशनल कंपनीच्या मालकीच्या इरॉस नाऊ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून या वेबसीरीजची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या ७ जुलैपासून या नवीन वेबसिरिजचं स्ट्रिमिंग सुरू होणार आहे. डेट गॉन राँग या सीरीजचा हा दुसरा भाग असून तोदेखील प्रेक्षकांना तेवढाच आवडेल अशी त्याच्या निर्मात्यांना आशा आहे. इरॉस ग्रुपच्या चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर रिधिमा लुल्ला याबाबत म्हणाल्या, 'व्हर्च्युअल डेटिंगच्या नवीन अनोख्या स्वरुपातला हा शो सर्व स्तरातील प्रेक्षकांना नक्की आकर्षित करेल, याची मला खात्री आहे.'