ETV Bharat / state

Covid Centre Scam : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी चहावाल्यासह दोघांना अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

author img

By

Published : Mar 1, 2023, 6:42 AM IST

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील कोविड सेंटरच्या 100 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे.

Covid Centre Scam
कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक

मुंबई : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी राजीव उर्फ राजू नंदकुमार साळुंखे (48) आणि सुनील उर्फ बाळा रामचंद्र कदम (58) या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्रथम रुग्णालयाजवळ असलेल्या चहावाला राजू उर्फ राजीव साळुंखेला बेड्या ठोकल्या. त्यानंतर साळुंखेला कोर्टात हजर केल्यास कोर्टाने 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजू साळुंखेच्या अधिक तपासानंतर सुनील कदम याला अटक करण्यात आली आहे.

हेराफेरीकरून कंत्राट घेतल्याचा आरोप : अटक आरोपी समोर पोलिसांनी गोळा केलेले सर्व कागदपत्र पुरावे सादर केले. त्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. लाईफ लाईन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिस आणि इतरांवर कागदपत्रांची हेराफेरीकरून कंत्राट घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा : केईएम हॉस्पिटलजवळील राजू चहावाला म्हणजेच राजीव नंदकुमार साळुंखे व सुनील (बाळा) कदम यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज भारतीय दंड संविधान कलम 420, 406, 465, 467, 468, 471, 304(A) अंतर्गत अटक केली आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी 24 ऑगस्टला भाजपा नेते किरीट सोमैया यांनी गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्हाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. सुजित पाटकरांचा लाईफलाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस कंपनीचा हा 100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा आहे. याप्रकरणी मुंबई पोलीसांकडून पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

किरीट सोमय्यांचे काय आहेत आरोप? : मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारच्या टेंडरची पारदर्शक प्रक्रिया न करता एका बोगस कंपनीला मुंबईतल्या अनेक कोविड सेंटरचे कॉन्टॅक्ट दिले असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यापर्करणी त्यांनी सुजित पाटकर यांच्या आरो केले होते. लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीने आपले पार्टनरशिप रजिस्ट्रेशन २६ जून २०२० ला झाले असल्याचे भासवले होते. पण जे पार्टनरशिप डिड आणि बाकी कागदपत्र दिले ते फर्जी होते असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. अशी कंपनी जी रजिस्टर झालेली नाही. ज्यांच्याकडे मनुष्यबळ नाही, कार्यालय नाही, अनुभव नाही अशा बोगस कंपन्यांना कोवि सेंटर चालवण्याचे कॉन्ट्रेक्ट देणे, हे कितपत योग्य आहे. आयसीयु युनिटचे कॉन्ट्राक्ट देणे म्हणजे हजारो कोविड रुग्णाेच्या जिवाशी खेळण्याचे काम लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनी आणि मुंबई महानगरपालिकेने केले होते, असा आरोप देखील किरीट सोमय्यांनी केला आहे. या कंपनीला पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने ब्लॅकलिस्ट केल्याची गोष्ट त्यांनी लपवली होती. मेडिकल इमर्जन्सीच्या नावाने भ्रष्टाचार आणि जिवाशी खेळ केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

हेही वाचा : Ramoji Film City : महिला दिनानिमित्त 'रामोजी फिल्म सिटी'त खास ऑफर; घरबसल्या आजच करा बुकिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.