ETV Bharat / state

घाटकोपरमध्ये 'पर्यावरण दिंडी'; झाडे लावा, पर्यावरण वाचवाचा दिला संदेश - prayavrn dindi

घाटकोपरमध्ये रविवारी 'समाज प्रबोधन सेवा संघ' आणि 'गार्डन ग्रुप' यांच्या संयुक्त विद्यमाने वॉकथॉन २०१९ चे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत "झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा" हा संदेश देण्यात आला. अनेक उच्चशिक्षित, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी दिंडीत सहभागी झाले होते.

घाटकोपर मध्ये 'पर्यावरण दिंडी'
author img

By

Published : Jul 7, 2019, 5:29 PM IST

मुंबई - घाटकोपरमध्ये रविवारी 'समाज प्रबोधन सेवा संघ' आणि 'गार्डन ग्रुप'च्या वतीने पर्यावरण दिंडीचे आयोजन करण्याट आले होते. घाटकोपरमधील शेकडो पर्यावरणप्रेमींनी यात सहभाग घेतला होता. पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यासाठी या वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

संघटनेच्या सदस्यांनी आणी नागरिकांनी विविध घोषणा आणि पर्यावरण वाचवाचा संदेश दिला. दिंडीत सहभागी वृक्षप्रेमींनी 'झाडे लावा, झाडे जगवा' , 'पाणी वाचवा' या विषयांवर जनजागृती केली. घाटकोपर च्या 'राम कृष्ण हरी गार्डन', जव्हारभाई प्लॉट येथून निघालेली ही वॉकथॉन बर्वे नगर, भटवाडी मार्गे फिरून पुन्हा 'राम कृष्ण हरी गार्डन' पर्यंत आली.

environment-rally-in-ghatkopar-mumbai-1-1-1-1
घाटकोपर मध्ये 'पर्यावरण दिंडी'

या पर्यावरण दिंडी मध्ये विभागातील अनेक उच्चशिक्षित, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील सहभागी झाले होते. या वेळी प्रत्येक उपस्थित वृक्ष प्रेमींना एक एक झाडाचे रोप देऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी देण्यात आली. मुंबई मध्ये वाढते प्रदूषण विकासकामांसाठी होत असलेली वृक्षतोड या बाबत या वेळी नागरिकांनी चिंता व्यक्त केली. तसेच या वॉकथॉन चे आयोजक संतोष सावंत व मधुकर साळवी यांनी यासारख्या कार्यक्रमातून पर्यावरण बाबत उपाय योजना देखील करणार असल्याचे सांगितले.

Intro: घाटकोपर मध्ये पर्यावरण दिंडी झाडे लावा झाडे जगवा

घाटकोपर मध्ये आज समाज प्रबोधन सेवा संघ आणि गार्डन ग्रुप च्या संयुक्त विद्यमाने झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी वॉकथॉन 2019 चे आयोजन करण्यात आलेBody: घाटकोपर मध्ये पर्यावरण दिंडी झाडे लावा झाडे जगवा

घाटकोपर मध्ये आज समाज प्रबोधन सेवा संघ आणि गार्डन ग्रुप च्या संयुक्त विद्यमाने झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी वॉकथॉन 2019 चे आयोजन करण्यात आले

घाटकोपर मधील शेकडो पर्यावरणप्रेमींनी यात सहभाग घेतला होता.विविध घोषणा आणि फलकातून या वेळी या वृक्षप्रेमींनी झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा या विषयांवर जनजागृती केली.घाटकोपर च्या राम कृष्ण हरी गार्डन जव्हारभाई प्लॉट मधून निघालेली ही वॉकथॉन बर्वे नगर, भटवाडी मार्गे फिरून पुन्हा राम कृष्ण हरी गार्डन पर्यंत आली.या वॉक थॉन मध्ये विभागातील अनेक उच्चशिक्षित, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील सहभागी झाले होते.या वेळी प्रत्येक उपस्थित वृक्ष प्रेमींना एक एक झाडाचे रोप देऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी देण्यात आली.मुंबई मध्ये वाढते प्रदूषण विकासकामांसाठी होत असलेली वृक्षांची कत्तल या बाबत या वेळी नागरिकांनी चिंता व्यक्त केली.तसेच या वॉकथॉन सारख्या कार्यक्रमातून या बाबत उपाय योजना देखील करणार असल्याचे सांगितले.

Byte: संतोष सावंत आयोजक
Byte: मधुकर साळवी आयोजक
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.