मुंबई - पोलीस खात्यात एकेकाळचे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेण्यात आलेले आहे. 2 डिसेंबर 2002 मध्ये मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या बॉम्ब ब्लास्ट संदर्भात परभणी येथून अटक करण्यात आलेला सॉफ्टवेअर इंजिनियर ख्वाजा युनूस याच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले होते.
त्यानंतर 2003 पासून त्यांच्यावर याप्रकरणी खटलाही दाखल करण्यात आला होता. पोलीस कस्टडीतून ख्वाजा युनूस पळून गेल्याचे या तपासादरम्यान आढळून आल्यानंतर त्याचा पत्ता लागला नव्हता. दरम्यान सचिन यांच्यावर लावण्यात आलेले आरोप अद्याप सिद्ध झालेले नसून त्यांना पुन्हा मुंबई पोलीस खात्यामध्ये सामावून घेण्यात आले आहे. सध्या सचिन वाझे यांची नेमणूक नायगाव सशस्त्र पोलीस दलात करण्यात आलेली आहे.
2 डिसेंबर 2002 साली मुंबईत घाटकोपर येथे घडलेल्या बॉम्ब ब्लास्ट संदर्भात परभणी येथील 27 वर्षीय ख्वाजा युनूस यास अटक करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात पोलीस तपासासाठी औरंगाबाद येथे आरोपी ख्वाजा युनूस यास वाहनाने घेऊन जात असताना पोलीस वाहनाचा अपघात झाला होता. या पोलीस रेकॉर्ड नुसार ख्वाजा युनूस हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. मात्र 2003 नंतर अजूनही ख्वाजा युनूस याचा तपास लागलेला नाही. सचिन वाझे व इतर पोलीस कर्मचारी ख्वाजा युनूस यास तपासासाठी घेऊन जात असताना ही घटना घडली होती. गेल्या वर्षांपूर्वी सचिन वाझे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून शिवसेनेच्या काही पदांवर काम सुद्धा केले होते.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू - Sachin waze
एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेण्यात आले आहे. 2 डिसेंबर 2002 मध्ये मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या बॉम्ब ब्लास्ट संदर्भात परभणी येथून अटक करण्यात आलेला सॉफ्टवेअर इंजिनियर ख्वाजा युनूस याच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले होते.