मुंबई : 75 हजार रोजगार देण्याचा महाराष्ट्राच्या महासंकल्प कार्यक्रमाची सुरुवात आजपासून करण्यात आली, असून यशवंतराव चव्हाण येथे हा कार्यक्रम पार (employment grand resolution started in state) पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री उदय सामंत आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे देखील उपस्थित (direct appointment letter to two thousand youth) होते.
दोन हजार तरुण सेवेत रुजू : येत्या वर्षभरात 75 हजार तरुणांना शासकीय नोकऱ्यापासून याची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे. विविध विभागातील दोन हजार तरुणांना सेवेत रुजू होण्याचे नियुक्तीपत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. नियुक्तीपत्र देत असताना ज्यांना नियुक्तीपत्र मिळाले नाही, त्यांनी कोर्टात जाऊ नये. तरुणांना ही संधी काही शेवटची संधी नाही, अशा अनेक संध्या आता राज्य सरकार तरुणांना देणार आहे. नोकऱ्या बाबतीत तरुण कोर्टात गेल्यानंतर त्या विभागाची भरती प्रक्रिया रखडते. त्यामुळे येणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेवर देखील परिणाम होतो. अशा सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना संबोधित करताना (Rojgar melava in Mumbai) दिली.
शासकीय नोकऱ्यांवरील बंदी उठवणार : गेल्या दहा ते पंधरा वर्षात शासकीय नोकऱ्यांवर अघोषित बंदी होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्रतेच्या अमृत महोत्सवी वर्षी तरुणांना शासकीय नोकऱ्या मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आपले सरकार शासकीय नोकऱ्यावरील अघोषित बंदी उठवणार आहे. वर्षभरात 75 हजार शासकीय नोकऱ्या राज्यातील तरुणांना मिळतील. तसेच गृह विभागाकडून काही दिवसातच पोलीस भरतीची 18000 पदे भरण्यात येतील, तर तसेच येणाऱ्या काही दिवसात ग्राम विकास विभागात 15000 पद भरली जाणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी तरुणांना संबोधित करताना केली. शासकीय नोकरी प्रक्रिया पूर्ण करत असताना अनेक वेळा घोटाळे झाल्याच्या समोर आलेला आहेत. म्हणूनच राज्य सरकारने यावेळी नोकरी प्रक्रियेसाठी प्रख्यात टीसीएस आणि देशभरात रेल्वे भरती आणि बँकांच्या परीक्षा घेणारी आयबीपीएस कंपनीला नोकरी भरती प्रक्रियाचे काम दिले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी (employment grand resolution) दिली.
महाराष्ट्रामागे केंद्र सरकार ठाम उभे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी दहा लाख शासकीय नोकऱ्या तरुणांना देण्याचं आश्वासन दिलं आहे. यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्याच माध्यमातून महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरला आहे. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर महाराष्ट्राने या वर्षात 75 हजार शासकीय नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या महासंकल्प माध्यमातून पहिला टप्पा पार पडत असून या टप्प्यात दोन हजार तरुणांना शासकीय नोकऱ्या प्रदान करण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर 75 व्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने राज्यात 75 हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिले असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकार मागील तेवढा निधी देत आहे. महाराष्ट्राचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मागे ठाम उभा असल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
पायाभूत सुविधा उभारण्याकडे खास लक्ष : शिंदे सरकारच्या गर्लफ्रेंड कारभारामुळेच राज्यातून प्रकल्प बाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. मात्र यालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमातून उत्तर दिले. राज्यात उद्योग मोठ्या प्रमाणात येत आहेत. तसेच जे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले ते कोणाच्या काळामध्ये गेले, हे देखील माहितीच्या अधिकारातून समोर आले असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे. राज्यामध्ये पायाभूत सुविधा उभारण्याकडे खास लक्ष दिले जात आहे. पायाभूत सुविधा उभारण्याच्या माध्यमातून हजारो नोकऱ्या तयार होणार आहेत. समृद्धी महामार्ग तसेच नावाशिवा लिंक रोड या दोन प्रकल्पातून देखील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगार वाढेल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) यावेळी व्यक्त केली.
ठाकरे सरकारवर ठपका : राज्यामध्ये तात्कालीन ठाकरे सरकार असताना संपूर्ण राज्यात नकारात्मकता होती. मात्र सरकार बदलल्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे सकारात्मकता पाहायला मिळते. नवीन सरकार आल्यानंतर राज्यात उत्साहात सण उत्सव साजरे झाले. उत्सवात सण उत्सव साजरे करण्यावर देखील विरोधक टीका करतात. गेली 18 महिने कॅबिनेटच्या उपसमितीची बैठक झाली नव्हती. मात्र नवीन सरकार येतात ती बैठक आम्ही घेतली. राज्य प्रगतीच्या मार्गाने निघाले असल्याचा चिमटा यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना काढला आहे.
महाराष्ट्रात सव्वा दोन कोटींचे प्रकल्प : राज्यात नवीन सरकार आल्यापासून सातत्याने प्रकल्प बाहेर जात आहे. राज्यामध्ये असंविधानिक सरकार असल्यामुळे विकासक किंवा गुंतवणूकदारांना राज्य सरकारवर भरवसा राहिला नाही. अशी टीका विरोधकांकडून सातत्याने सत्ताधारी पक्षावर केली जाते. मात्र आज या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेश पाठवला होता. या संदेशात महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होणार असल्याचे संकेत पंतप्रधानांनी दिले आहेत. येत्या काळात महाराष्ट्र मध्ये दोन लाख कोटींचे सव्वा दोनशे प्रकल्प राज्यात होणार असल्याचे संकेत पंतप्रधानांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. रेल्वे भरती आणि पोलीस भरतीच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचे संकेत यावेळी पंतप्रधानांनी दिली आहेत.