ETV Bharat / state

Rashmi Shukla : फोन टॅपिंगचा वाद गाजला! वाचा, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची कारकीर्द - Rashmi Shukla

महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला, सदानंद दाते आणि अतुलचंद्र कुलकर्णी यांची केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने डीजीपी म्हणजेच पोलीस महासंचालक म्हणून बढती केली आहे. (Career Of IPS Officer Rashmi Shukla) या तीन अधिकाऱ्यांपैकी चर्चेत असणाऱ्या नाव म्हणजे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला. रश्मी शुक्ला या महाविकास आघाडीच्या काळात फोन टॅपिंगच्या वादात अडकल्या होत्या. नंतर त्यांना क्लीन चिट मिळाली.

Rashmi Shukla
Rashmi Shukla
author img

By

Published : Feb 13, 2023, 4:16 PM IST

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय नेत्यांच्या बेकायदेशीरपणे फोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तत्कालीन सरकारने त्रिसदस्यीय समितीची स्थापना करत समितीने दिलेल्या अहवालात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या अहवालाची शहानिशा केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याचा अहवाल (Closure Report) गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पोलिसांनी न्यायालयात केल्यानंतर शुक्ला यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली. नंतर काही दिवसात रश्मी शुक्ला यांच्या रूपाने मुंबईला महिला पोलीस आयुक्त मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

हैद्रराबाद येथे होत्या कार्यरत : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्त म्हणून चर्चेत होते. रश्मी शुक्ला (१९८८) च्या बॅचच्या आयपीएस आधिकारी आहेत. रश्मी शुक्ला बढतीआधी हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, रश्मी शुक्ला बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी सरकारने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली होती. त्या समितीने दिलेल्या अहवालात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या अहवालाची शहानिशा केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोण आहेत रश्मी शुक्ला? : रश्मी शुक्ला १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी ( IPS Rashmi Shukla ) आहे. रश्मी शुक्ला सध्या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांना डीजीपी म्हणून बढती मिळालेली आहे. माजी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्यानंतर शुक्ला या सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. नगराळे ३१ ऑक्टोबर रोजी निवृत्त होत झाले. रश्मी शुक्ला या राज्यातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. शुक्ला या IPS अधिकारी रजनीश सेठ यांच्याहून देखील वरिष्ठ आहेत. शुक्ला जून २०२४ मध्ये निवृत्त होणार आहेत.

सदानंद दाते यांना महासंचालकपदी : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. कॅबिनेट नियुक्त समितीने सन (1988 व 1999)बॅचच्या देशभरातील 20 अधिकाऱ्यांना बढती दिली आहे. यामध्ये रश्मी शुक्ला, अतुलचंद्र कुलकर्णी, सदानंद दाते यांना महासंचालकपदी बढती मिळाली आहे. सदानंद दाते हे मुंबईतील कायदा व सुव्यस्था तसेच, गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त होते. (26/11)च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात दाखवलेल्या शौर्याबद्दल दाते यांचा गौरवही करण्यात आला. ते तीन वर्षे केंद्र राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकही होते.

हेही वाचा : बड्या नेत्याच्या फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.