मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी (Elgar Parishad case) अटकेत असलेल्या दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हनी बाबू (Honey Babu) यांनी अंतरिम वैद्यकीय जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका धाव घेतली आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रियेसह पोटाचे विकार आणि हाडांशी संबंधित आजाराने खासगी रुग्णालयात उपचार करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी बाबूंनी याचिकेत केली आहे. या याचिकेवर 13 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
न्यायालयात अर्ज दाखल : आरोग्याशी संबंधित समस्यांवर उपचार घेण्यासाठी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगीसाठी कारागृह अधिक्षक आणि विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मोतीबिंदूमुळे दृष्टी गमावत असून आपल्याला पोटदुखी आणि गुडघे दुखीचाही त्रास होत आहे. गुडघ्यातून होणाऱ्या वेदना असह्य आहेत. त्यामुळे दैनंदिन कामे करण्यासही अडचणींचा सामाना करावा लागत आहे. या तिन्ही समस्यांसंदर्भात तातडीने चाचणी करण्यासाठी आणि उपचार सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बाबू यांनी याचिकेतून केली आहे. त्यावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी (Elgar Parishad case Accused Honey Babu) झाली.
अहवाल पाहण्याचे आदेश : वैद्यकीय चाचणीसाठी बाबू यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी त्यांच्यावतीने अँड. युग चौधरी यांनी न्यायालयाकडे केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे वकील संदेश पाटील यांनी वैद्यकीय चाचणीच्यावेळी बाबू यांच्या नातेवाईकांनी उपस्थित असण्यावर आक्षेप घेतला. त्यावर बाबू यांचे वैद्यकीय अहवाल पाहण्याचे आदेश न्यायालयाने एनआयएला देत याचिकेवरील सुनावणी 13 डिसेंबर रोजी निश्चित (Hearing on medical bail application on December 13) केली.
काय आहे प्रकरण : पेशव्यांचं मराठा सैन्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. या युद्धात पेशव्यांविरोधात ईस्ट इंडिया कंपनीबरोबर महार रेजिमेंट लढली होती आणि यात बहुतांश दलित सैनिक (Hearing on medical bail application) होते.
माओवादी संघटनांचा हात : पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती. त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. या हिंसाचाराला एक दिवस अगोदर म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदे तील वक्तव्य कारणीभूत होती, अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. या एल्गार परिषदेमागे माओवादी संघटनांचा हात होता, असे म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक (medical bail application ) केली.