ETV Bharat / state

Electricity workers are on strike : राज्यभरात वीज कर्मचाऱ्यांचा संप, मात्र मुंबईत संपाचा फटका नाही - वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका

राज्यभरातील विविध कर्मचारी तीन दिवसाच्या संपावर (Power Unions Aggressive) गेले आहेत. राज्यातील जवळपास 80 टक्के वीज कर्मचारी संपावर गेले असल्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण राज्यभर आज सकाळपासून पाहायला मिळत आहे. (Power Unions Aggressive against privatisation) अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला समोर जावे लागत आहे. अदानी इलेक्ट्रिकने भांडुप क्षेत्रात वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे परवाना मागितला आहे. याच्या विरोधात वीज कर्मचारी तीन दिवसाच्या संपावर गेले आहेत. (Maharashtra State Power Generation Commission) केवळ कर्मचारीच नाही तर अभियंता आणि अधिकारी देखील या संपात सामील झाले आहेत. (Electricity workers are on strike)

Electricity workers are on strike
राज्यभरात वीज कर्मचाऱ्यांचा संप
author img

By

Published : Jan 4, 2023, 1:35 PM IST

मुंबई : महाराष्ट्रातील तीन (Power Unions Aggressive) सरकारी वीज कंपन्यांच्या युनियनने वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ बुधवारपासून ७२ तासांच्या संपाचा इशारा दिला आहे, (Maharashtra State Power Generation Commission) अशी माहिती एका अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. वीज कंपनी संघटनांची महाराष्ट्र राज्य कर्मचारी, अधिकारी आणि अभियान संघर्ष समिती या कृती समितीने हा संप पुकारला आहे. (Power Unions Aggressive against privatisation)

वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी तयारी : राज्याच्या अनेक ठिकाणी वीज कर्मचारी संपावर गेल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. मुंबईत वीज पुरवठा खंडित होण्याचा फटका बसू नये यासाठी महावितरण ने तयारी केली आहे. (Impact of electricity workers strike ) मुंबईतील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडळ आणि मंडळ कार्यालयाच्या ठिकाणी 24 तास लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष तयार करण्यात आल आहे. मुंबईत वीज वितरण करणाऱ्या कंपन्या महावितरण ऐवजी टाटा पावर, आदानी इलेक्ट्रिकल्स बेस्ट पावर, अशा कंपन्यांकडून वीज वितरण केले जाते. या सर्व कंपन्यांकडून मुंबईत आणि मुंबईच्या उपनगर भागामध्ये अखंडित सेवा सुरू आहे. त्यामुळे संपाच्या पहिल्या दिवशी तरी मुंबईत येथे वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बसलेला नाही. (Electricity workers are on strike)

लोकल सेवेला अद्याप फटका नाही : मुंबईची जीवन वाहिनी म्हणून लोकल सेवा ओळखली जाते, लोकल हे देखील विजेवर चालते. मात्र वीज कर्मचाऱ्यांचा संप असला तरी अद्याप लोकल सेवेला कोणताही फटका बसलेला नाही. मध्य रेल्वे सेंट्रल रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तीनही रेल्वे मार्गावर लोकल सेवा व्यवस्थितपणे सुरू आहे. राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेल्यामुळे मुंबईतील लोकल सेवेवर देखील त्याचा परिणाम होईल का याबाबत मुंबईकरांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले होते. मात्र सध्या तरी लोकल सेवेवर या संपाचा कोणताही परिणाम जाणवत नाहीये. गेल्या महिन्यात राज्य सरकारला दिलेल्या संपाच्या सूचनेमध्ये कृती समितीने मागण्या मान्य न झाल्यास १८ जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशाराही दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.