ETV Bharat / state

Diwali Festival : दिवाळीनिमित्त मुंबईत विद्युत रोषणाई, पाहा Photo - मुंबईत विद्युत रोषणाई

दिवाळीनिमित्त ( occasion of Diwali ) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभाग, कार्यालयाला ( Electric lighting in Mumbai ) विद्युत रोषणाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार मुंबईत अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याचा आनंद मुंबईकर तसेच पर्यटक घेत आहेत.

Diwali Festival
दिवाळीनिमित्त मुंबईत विद्युत रोषणाई
author img

By

Published : Oct 23, 2022, 9:30 PM IST

मुंबई - दिवाळीनिमित्त ( occasion of Diwali ) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभाग, कार्यालयाला ( Electric lighting in Mumbai ) विद्युत रोषणाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार मुंबईत अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याचा आनंद मुंबईकर तसेच पर्यटक घेत आहेत.

Diwali Festival
मरीन ड्राईव्ह

मुंबईत रोषणाई - घरोघरी तिरंगा अभियानामध्ये मुंबई महानगरात केलेल्या विद्युत रोषणाईचे मुंबईकरांनी कौतुक केले होते. नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्याचा हातभारही लागला. त्याच धर्तीवर दीपावली निमित्त मुंबई महानगरातील महत्त्वाची व अधिकाधिक नागरिकांच्या दृष्टीक्षेपात असणारी सार्वजनिक स्थळं, महत्त्वाचे रस्ते, वाहतूक बेटं आदी ठिकाणी विभाग कार्यालयांच्या माध्यमातून दिनांक २२ ते २९ ऑक्टोबर या एका आठवड्याच्या कालावधीसाठी आकर्षकरित्या विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागासाठी १५ लाख प्रमाणे तीन कोटी ६० लाख रुपयाचा निधी देण्यात आला असल्याची माहिती महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिली आहे.

Diwali Festival
गिरगाव चौपाटी

या ठिकाणी विद्युत रोषणाई - गेटवे ऑफ इंडियाला विविध रंगांची रोषणाई करण्यात आली आहे. मरीन ड्राईव्ह म्हणजेच क्वीन नेकलेसला रोषणाई करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी येथे समुद्रामध्ये असलेल्या दगडाच्या आकाराच्या टेट्रापॉडसला रोषणाई करण्यात आली आहे. याच प्रमाणे उद्याने, रस्ते आणि वाहतूक बेटे यांना रोषणाई करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.