ETV Bharat / state

University Elections : ई- टिव्हीच्या दणक्यामुळे विद्यापीठातील निवडणुका घेण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी

author img

By

Published : Oct 23, 2022, 6:48 PM IST

Updated : Oct 31, 2022, 12:13 PM IST

ई- टिव्हीच्या दणक्यामुळे विद्यार्थांनी विद्यापीठातील निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. याबबत ई-टिव्हीने काही विद्यार्थांशी संवाद साधला असता विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरु करण्यची मागणी केली आहे. केंद्रीय विद्यापीठात निवडणुका चालतात ( Elections are held in central universities ) मग महाराष्ट्राच्या विद्यापीठात निवडणुका का ( no university elections in Maharashtra ) नाही असा प्रश्न विद्यार्थामध्ये निर्माण झाला आहे. राज्यात तीस वर्षांपासूनची विद्यापीठीय निवडणूकीवरील बंदी हटवण्याची ( Remove the ban on university elections ) मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

University Elections
University Elections

मुंबई - टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत ( Tata Institute of Social Sciences ) नुकत्याच निवडणुका झाल्या. ह्या निवडणुका कोरोना महामारीमुळे दोनवर्षे स्थगित केल्या होत्या . ( TISS )मधील निवडणुकी नंतर राज्यातील विद्यार्थी संघटनांची हलचाल वाढली आहे. त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील निवडून आलेल्या विद्यार्थी संघाचे अभिनंदन केले आहे. परंतु राज्यात तीस वर्षांपासून विद्यापीठात निवडणुकांना बंदी आहे . ती बंदी हटवली पाहिजे अशी लाखो विद्यार्थ्यांची ( Remove the ban on university elections ) भावना आहे .

महाराष्ट्राच्या विद्यापीठात निवडणुका का नाही?

निवडणुकावरील बंदी हटवण्याची मागणी - राज्यात विद्यार्थी संघाच्या निवडणुका होत होत्या त्यातून विद्यार्थी नेतृत्व पुढे आलं . त्यामुळेच अनेक चांगले लोकप्रतिनिधी देखील पुढे आले. मात्र राज्यात २५ वर्षांपूर्वी दोन गटात मारामारी, नंतर खून झाला. महाविद्यालयीन निवडणुकीत दुर्घटना झाली होती. त्यानंतर केंद्र शासनाने लिंगडोह आयोग नेमला गेला. नंतर विद्यार्थी निवडणुका बंद केल्या गेल्या. परिणामी विद्यार्थी वर्गाच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचत नाही. टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे निवडणुका झाल्याने समस्त विद्यार्थी संघटनांनी देखील मागणी पुन्हा लावून धरली आहे.

तीस वर्षापासून बंदी - ह्या बाबत महाराष्ट्र स्टुडन्ट युनियन नेते विकास शिंदे ( Maharashtra Student Union Leader Vikas Shinde ) यांच्या सोबत ईटीव्ही भारत वतीने संवाद साधला असता ,' महाराष्ट्रात राज्याच्या ११ अकृषि,४ कृषी,१ विज्ञान,१ अभियांत्रिकी अश्या १७ सार्वजनिक विद्यापीठामध्ये गेल्या ३० वर्षांपासून विद्यार्थी निवडणूका होत नाहीत ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटंबातील नेतृत्वाला मुख्य प्रवाहातील राजकारणात येथील प्रस्थापित घराणेशाही राजकारण्यांनी जाणीव पूर्वक येऊ दिले नाही;अशी प्रतिक्रिया दिली आहे .

विद्यार्थी संघाच्या निवडणुकीवरील बंदी उठवावी - तर आलं इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे नेते अमीर काझी ( All India Students Federation leader Amir Qazi ) यांनी सांगितले, २५ वर्षांपूर्वी दुर्घटना घडली त्यानंतर निवडणुका बंद झाल्या. लिंगडोह आयोगाने निवडणुका नसाव्या अशी शिफारस केली. परंतु विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यात आम्हला अडचणी येतात. ह्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थी निवडणुका सुरु व्हाव्यात. विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना ह्या निवडणुकीवर बंदी हटवण्याचे सूतोवाच केले होते. ती केवळ घोषणाच राहिली. जरहे शासन निवडणुका सुरु करणार नाही तर आम्ही रस्तावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील दिला आहे. तसेच छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे नेते रोहित ढाले यांनी देखील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीवरील बंदी उठवावी अशी मागणी केली आहे.

Last Updated : Oct 31, 2022, 12:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.