ETV Bharat / state

इतिहास 'मनसे' च्या बाजूने! शिवसेनाही कधी काळी होती अडचणीत - विधानसभा निवडणूक

राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मनसेही शिवसेनेसारखीच संघटना. त्यांचे कार्यकर्तेही शिवसेनेच्याच मुशीत तयार झालेले. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा एक कलमी अंमल. बाळासाहेबच राज यांचे आयडॉल. राज यांची काम करण्याची शैलीही बाळासाहेबांप्रमाणे आक्रमक आणि एक कलमी...मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणे हा दोन्ही पक्षांचा अजेंडा. ही झाली दोन्ही पक्षातील साम्य.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
author img

By

Published : Sep 23, 2019, 11:04 AM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात आहे. सर्वच पक्ष कामाला लागेल आहेत. मात्र मनसेचे अजूनही काही ठरलेले नाही. त्यात मनसे निवडणूक लढणार नाही. अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात आहे. ऐवढेच नाही तर मनसेचे अस्तित्वच संपले आहे. यानंतर मनसे हा पक्षच नगण्य असेल. त्याची दखलही घेतली जाणार नाही असे म्हणारा राजकारणातला मोठा गट आहे. पण इतिहासात डोकावून पाहिले असता, इतिहास हा मनसेच्या बाजूने आहे. त्यामुळे जर हा काळ मनसेसाठी वाईट असला तरी तो सदासर्वदा असणार नाही, हे इतिहास पाहिल्यानंतर लक्षात येते.

राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मनसेही शिवसेनेसारखीच संघटना. त्यांचे कार्यकर्तेही शिवसेनेच्याच मुशीत तयार झालेले. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा एक कलमी अंमल. बाळासाहेबच राज यांचे आयडॉल. राज यांची काम करण्याची शैलीही बाळासाहेबांप्रमाणे आक्रमक आणि एक कलमी...मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणे हा दोन्ही पक्षांचा अजेंडा. ही झाली दोन्ही पक्षातील साम्य.

हेही वाचा - कुमार सानू यांच्या आवाजाची आजही चाहत्यांवर भूरळ, आजही हिट आहेत 'ही' रोमॅन्टिक गाणी

आज जी मनसेची स्थिती आहे तीच स्थिती आणीबाणी आणि त्यानंतरच्या काळात शिवसेनेची झाली होती. त्यांचे अस्तित्वच संपले अशी अवस्था होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सध्या ईडीची भिती दाखवली जात आहे. त्यामुळेच ते शांब बसले आहेत. आणीबाणीवेळी बाळासाहेबांना इंदीरा गांधीनी अशाच पद्धतीने दबाण आणला होता असे राजकीय विश्लेशक सांगतात. त्यातूनच त्यांनी आणीबाणीला समर्थ केलं होतं. मात्र आणीबाणी नंतर शिवसेनेची अवस्था आणखीनच बिकट झाली. आणीबाणीनंतरच्या निवडणूकीत काँग्रेसची वाताहत झाली. शिवसेनेचीही तीच स्थिती झाली. सेना फक्त मुंबई महापालिके पुरती शिल्लक राहिली.

हेही वाचा - पक्षांतराचे पर्व... युतीत आले आघाडीचे 'साखर सम्राट' सर्व!

शिवसेनेची ८० च्या दशकातील स्थिती पहाता हा पक्ष संपेल असेच सर्वांना वाटत होते. मात्र १९८३- ८४ च्या काळात वसंतदादा पाटलांनी 'मुंबई केंद्रशाशीत करण्याचा डावा आहे ' असे पिल्लू सोडून दिले. शिवसेनेने हा मुद्दा लगेच उचलून धरला. मरगळ आलेल्या शिवसेनेत अचानक उत्साह संचारला. मुंबईसाठी कार्यकर्ता पून्हा एकदा पेटून उठला. त्याच काळात राम मंदीराचा प्रश्न समोर आला. शिवसेनेने त्यातही उडी घेतली. विषय देशभर पेटला. मात्र त्याचा थेट राजकिय फायदा शिवसेनेला झाला. गोरेगाव विधानसभेची पोट- निवडणूक शिवसेनेने राम नाम आणि गर्व से कहो हिंदू है, या मुद्द्यावर जिंकले. हा मुद्दा पुढच्या निवडणुकांतही अग्रस्थानि राहीला. मात्र त्यामुळे शिवसेनेला नवसंजिवनी मिळाली.

हेही वाचा - पवारांच्या 'हट्टा'पोटी काँग्रेसची वाताहात?

हा इतिहास विसरून चालणार नाही. मनसेही अशीच आक्रमक संघटना आहे. मराठीच्या मुद्यावर मनसेने पहिल्याच निवडणूकीत १३ आमदार निवडून आले होते. अशाच नव्या मुद्द्याच्या शोधात मनसे सध्या आहे. तसा मुद्दा मिळाल्यास मनसे नक्कीच मुसंडी मारेल. शिवाय राज ठाकरे यांचा करिश्मा आजही कायम आहे. त्यांच्या करिश्मावर पक्षाला आणि स्वत: राज यांना विश्वास आहे. बाळासाहेबांनी आपल्या करिष्म्याच्या जोरावर वाईट स्थितत असलेल्या शिवसेनेला बाहेर काढले. राजही तसे करू शकतात हा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांत आहे. शिवाय पक्षात येणारे चढ उतार राज यांना नवे नाहीत. याची कल्पना त्यांनाही आहे. ते फक्त संधीच्या शोधात आहेत. ती मिळाल्यास आजचे चित्र नक्कीच बदलेले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Intro:Body:

मुंबई- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात आहे. सर्वच पक्ष कामाला लागेल आहेत. मात्र मनसेचे अजूनही काही ठरलेले नाही. त्यात मनसे निवडणूक लढणार नाही. अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात आहे. ऐवढेच नाही तर मनसेचे अस्तित्वच संपले आहे. यानंतर मनसे हा पक्षच नगण्य असेल. त्याची दखलही घेतली जाणार नाही असे म्हणारा राजकारणातला मोठा गट आहे. पण इतिहासात डोकावून पाहिले असता इतिहास हा मनसेच्या बाजूने आहे. त्यामुळे जर हा काळ मनसेसाठी वाईट असला तरी तो सदासर्वदा असणार नाही हे इतिहास पाहिल्यानंतर लक्षात येते. 

राज ठाकरे यांनी शिवसेनेत बाहेर पडून महाराष्ट्र नव निर्माण सेनेची स्थापना केली. मनसेही शिवसेने सारखीच संघटना. त्यांचे कार्यकर्तेही शिवसेनेच्याच मुशीत तयार झालेले. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा एक कलमी अंमल. बाळासाहेबच राज यांचे आयडॉल. राज यांची काम करण्याची शैलीही बाळासाहेबां प्रमाणे आक्रमक आणि एक कलमी...मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणे हा दोन्ही पक्षांचा अजेंडा. ही झाली दोन्ही पक्षातील साम्य. 

आज जी मनसेची स्थिती आहे तीच स्थिती आणीबाणी आणि त्यानंतरच्या काळात शिवसेनेची झाली होती. त्यांचे अस्तित्वच संपले अशी अवस्था होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सध्या ईडीची भिती दाखवली जात आहे. त्यामुळेच ते शांब बसले आहेत. आणीबाणीवेळी बाळासाहेबांना इंदीरा गांधीनी अशाच पद्धतीने दबाण आणला होता असे राजकीय विश्लेशक सांगतात. त्यातूनच त्यांनी आणीबाणीला समर्थ केलं होतं. मात्र आणीबाणी नंतर शिवसेनेची अवस्था आणखीनच बिकट झाली. आणीबाणीनंतरच्या निवडणूकीत काँग्रेसची वाताहत झाली. शिवसेनेचीही तीच स्थिती झाली. सेना फक्त मुंबई महापालिके पुरती शिल्लक राहिली. 

शिवसेनेची ८० च्या दशकातील स्थिती पहाता हा पक्ष संपेल असेच सर्वांना वाटत होते. मात्र १९८३- ८४ च्या काळात वसंतदादा पाटलांनी 'मुंबई केंद्रशाशीत करण्याचा डावा आहे ' असे पिल्लू सोडून दिले. शिवसेनेने हा मुद्दा लगेच उचलून धरला. मरगळ आलेल्या शिवसेनेत अचानक उत्साह संचारला. मुंबईसाठी कार्यकर्ता पून्हा एकदा पेटून उठला. त्याच काळात राम मंदीराचा प्रश्न समोर आला. शिवसेनेने त्यातही उडी घेतली. विषय देशभर पेटला. मात्र त्याचा थेट राजकिय फायदा शिवसेनेला झाला. गोरेगाव विधानसभेची पोट- निवडणूक शिवसेनेने राम नाम आणि गर्व से कहो हिंदू है, या मुद्द्यावर जिंकले. हा मुद्दा पुढच्या निवडणुकांतही अग्रस्थानि राहीला. मात्र त्यामुळे शिवसेनेला नवसंजिवनी मिळाली. 

हा इतिहास विसरून चालणार नाही. मनसेही अशीच आक्रमक संघटना आहे. मराठीच्या मुद्यावर मनसेने पहिल्याच निवडणूकीत १३ आमदार निवडून आले होते. अशाच नव्या मुद्द्याच्या शोधात मनसे सध्या आहे. तसा मुद्दा मिळाल्यास मनसे नक्कीच मुसंडी मारेल. शिवाय राज ठाकरे यांचा करिश्मा आजही कायम आहे. त्यांच्या करिश्मावर पक्षाला आणि स्वत: राज यांना विश्वास आहे. बाळासाहेबांनी आपल्या करिष्म्याच्या जोरावर वाईट स्थितत असलेल्या शिवसेनेला बाहेर काढले. राजही तसे करू शकतात हा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांत आहे.  शिवाय पक्षात येणारे चढ उतार राज यांना नवे नाहीत. याची कल्पना त्यांनाही आहे. ते फक्त संधीच्या शोधात आहेत. ती मिळाल्यास आजचे चित्र नक्कीच बदलेले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.