मुंबई - मनसेने(महाराष्ट्र नवनिर्माण सेना) आपली राजकीय भूमिका आणि ध्वज बदलत आपल्या नवीन ध्वजात शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केला. या विरोधात संभाजी ब्रिगेड, जय हो फाउंडेशन आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने आक्षेप नोंदवला. याबाबत त्यांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने मनसेला नोटीस बजावली आहे.
याबाबत मनसेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या नोटीसला कशा प्रकारे उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.