ETV Bharat / state

Election Commission : उद्धव ठाकरेंच्या गटाची वाढली डोकेदुखी, निवडणूक आयोगाने 'हा' दिला दणका - Election Commission freeze Shiv Sena name symbol

शिवसेनेतील फूटीनंतर खरी शिवसेना कोणाची, या वादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने 11 लाखांपेक्षा अधिक प्रतिज्ञापत्र सादर ( Shiv Sena group 11 lakh affidavits submitted ) केली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Oct 26, 2022, 2:00 PM IST

मुंबई : शिवसेनेतील फूटीनंतर खरी शिवसेना कोणाची, या वादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने 11 लाखांपेक्षा अधिक प्रतिज्ञापत्र सादर ( Shiv Sena group 11 lakh affidavits submitted ) केली. त्यापैकी आयोगाच्या विहित नमुन्यात निरुपयोगी ठरलेली सुमारे अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने बाद ठरवली ( commission reject Two and half lakh affidavit ) आहेत. उर्वरित ठाकरे गटाची साडे आठ लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे जमा असली तरी शिवसेना पक्षप्रमुखांची डोकेदूखी वाढली आहे.

11 लाखांपेक्षा अधिक प्रतिज्ञापत्र सादर : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेने गटाने धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता. यावरुन उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटाकडून नाव आणि चिन्ह यावर दावा करण्यात आल्यामुळे निवडणूक आयोगाकडून चिन्हासह नाव देखील गोठवण्यात आले ( Election Commission freeze Shiv Sena name symbol ) आहे. त्यामुळे आता दोन्ही गटाकडून शिवसेना ही आमचीच आहे, हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येत आहेत.

अडीच लाख प्रतिज्ञापत्रांचा फॉरमॅट चुकला : आयोगाच्या आदेशानुसार शिंदे - ठाकरे गटाने आमचीच शिवसेना खरी असा दावा सिद्ध करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून पक्षाच्या लाखो सदस्यांच्या मार्फत पाठिंब्याची प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत. परंतू, ठाकरे गटांची अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद ठरवण्यात आली आहेत. ठाकरे गटाने जवळपास 11 लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात सादर केली होती. यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्रांचा फॉरमॅट चुकल्याने निवडणूक आयोगाने रद्द ठरवली आहेत. तर, उर्वरीत साडेआठ लाख प्रतिज्ञापत्र वैध ठरवली आहेत. मात्र, अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने रद्द केल्याने या निर्णयाचा फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.