मुंबई - वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात मद्रास न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे आढले आहेत. देशात वाढत्या रुग्ण संख्येला निवडणूक आयोग कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच सर्वोच्च न्यालायलाने या प्रकरणाची दखल घ्यावी, असेही मलिक म्हणाले आहेत.
संपूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाची -
देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. परंतु, निवडणूक आयोगाने पाच राज्यात निवडणुका घेतल्या. विजयी निवडणुकांवर आयोगाने बंदी घातली. याप्रकरणी मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. तसेच लिलानंदन यांच्या हत्येप्रकरणी न्यायलयात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले. देशात यामुळे कोरोना प्रसार आणि प्रादुर्भाव वाढला आहे. निवडणुकांत मोठ्या प्रमाणात सुट दिली. प्रसार आणि प्रादुर्भाव वाढला. ही संपूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. सर्वोच्च न्यायालयाने यात लक्ष घालावे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.
अमित शहा राजीनामा कधी देणार -
पाच राज्यांच्या निवडणुकांवेळी भाजपकडून जास्त जागा जिंकण्याचा दावा केला जात होता. पंजाबमध्ये निवडणुकांदरम्यान, हिंसा झाली. सहा जणांना गोळ्या मारण्यात आल्या. ममता बॅनर्जींनी यानंतर अमित शहा यांचा राजीनाम्याची मागणी केली. मात्र शहा, यांनी राजीनामा देण्यास विरोध दर्शवला होता. पंजाबमधील लोकांनी भाजपला नाकारुन अमित शहा यांचा राजीनामा मागितला आहे. आता ते राजीनामा कधी देतील, याकडे देशाचे लक्ष आहे, असे मलिक म्हणाले.
कोरोना विरोधातील लढा राजकीय पक्षांना सोबत घेऊन करा -
लॉकडाऊन, लसीकरणाचे दर आणि लोकांना लस देण्याबाबतची भूमिका केंद्राने स्पष्ट करावी. आता निवडणूक संपली आहे. लॉकडाऊन लावणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी म्हणाले. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्यानुसार एक धोरण आखावे. लसीकरणा बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सुप्रिम कोर्टाकडून याबाबत माहिती मागवली जात आहे. कोर्ट त्यानुसार निर्णय घेईल. तोपर्यंत पंतप्रधानांनी देशात आरोग्य आपत्ती लागू करावी, अशी मागणी मलिक यांनी केली. देशातील सर्व राजकीय पक्षाच्या विरोधकांना सोबत घेऊन रणनीती आखायला हवी. पंतप्रधान मोदींच्या एकटे काही करु शकत नाही. सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊनच लढा लढायला हवा, असे मलिक म्हणाले.
हेही वाचा - अविवाहित प्रियकराने केले लग्न, विवाहित प्रेयसीने पती आणि दिराच्या मदतीने काढला काटा