मुंबई - निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने सायन भागातून ११.८५ लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. ही रक्कम कोणाची आहे, कोणत्या पक्षाची आहे याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.
निवडणूक आयोगाने निवडणूक काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी भरारी पथकाची स्थापना केली आहे. याच पथकाने सायनमधील भागात ११.८५ लाखांची बेहिशेबी रक्कम जप्त केली आहे.