ETV Bharat / state

औसा येथील आचारसंहिता भंगाचा अहवाल मवाळ असल्यानेच कारवाई नाही ? - voter

निवडणुक आयोगाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी आपले मत बालाकोटमध्ये हल्ला करणाऱ्यांना आणि पुलवामामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना समर्पित करावे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.

निवडणूक आयोग
author img

By

Published : Apr 16, 2019, 12:29 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम मतदान करणाऱ्या युवकांना आपले मत पुलवामाच्या हुतात्म्यांना अर्पण करण्याचे आवाहन केले, त्यावर आयोगाने अद्याप कारवाई का केली नाही? असे प्रश्न उपस्थित केले आहे. उस्मानाबाद जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा अहवालच मवाळ असल्याने कारवाईसाठी विलंब होत असल्याची माहीती निवडणुक आयोगाच्या सुत्रांनी दिली आहे.

औसा येथे झालेल्या सभेमध्ये बालाकोटमधील हवाई हल्ल्यासंदर्भात मत मागितल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केलेले विधान सकृतदर्शनी आचारसंहितेचा भंग आहे, असे उस्मानाबाद जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले असल्याचे वृत्त आहे.
निवडणुक आयोगाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी आपले मत बालाकोटमध्ये हल्ला करणाऱ्यांना आणि पुलवामामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना समर्पित करावे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. राजकीय फायद्यासाठी सुरक्षा दलांचा वापर करता येत नाही, असे निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या विधानामुळे आचारसंहितेचा १०० टक्के भंग असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उस्मानाबाद जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा अहवाल मवाळ असल्याने थेट कारवाई केली नसल्याचे सांगितले.

आयोगातील सूत्रांनी याबाबत माहिती दिली देताना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र मुख्य निर्णय अधिकाऱ्यांना याबाबत अहवाल पाठविला आहे. राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावर ट्रन्सक्रीप्ट जोडून तो अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. त्यासोबत औसा (जि. लातूर) येथील सभेचे आयोगाने केलेले व्हिडीओ फुटेज देखील पाठवले आहे. सभेचा व्हिडीओ देखील आचारसंहिता भंगाच्या कारवाईसाठी पुरेसा असल्याने या हाय प्रोफाईल आचारसंहिता भंगाच्या प्रकरणावर आयोग अंतिम निर्णय आयोग काय घेते याकडे लक्ष लागले आहे.

Intro:Body:MH_EC_PM_MCC_Ausa16.4.19

औशातील आचारसंहिता भंगाचा अहवाल मवाळ?
कारवाईसाठी विलंब होतोय का?
मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम मतदार करणाऱ्या युवकांना आपले मत पुलवामाच्या शहीदांना अर्पण करण्याचे आवाहन केले, त्यावर आयोगाने अद्याप कारवाई का केली नाही ? असे प्रश्न उपस्थित केले जात असताना
उस्मानाबाद जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा अहवालच मवाळ असल्याने कारवाईसाठी विलंब होत असल्याची माहीती निवडणुक आयोगाच्या सुत्रांनी दिली आहे.

औसा येथे झालेल्या सभेमध्ये बालाकोटमधील हवाई हल्ल्यासंदर्भात मत मागितल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केलेले विधान सकृतदर्शनी आचारसंहितेचा भंग आहे, असे उस्मानाबाद जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले असल्याचे वृत्त आहे. 
निवडणुक आयोगाच्या सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार
निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी आपले मत बालाकोटमध्ये हल्ला करणाऱ्यांना आणि पुलवामामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना समर्पित करावे,’ असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. राजकीय फायद्यासाठी सुरक्षा दलांचा वापर करता येत नाही, असे निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या विधानामुळे आचारसंहितेचा १०० टक्के भंग असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.उस्मानाबाद जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा अहवाल मवाळ असल्याने थेट कारवाई केली नसल्याचे सांगितले.

आयोगातील सूत्रांनी याबाबत माहिती दिली देताना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र मुख्य निर्णय अधिकारी (सीईओ) यांना याबाबत अहवाल पाठविला आहे. राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावर ट्रन्सक्रीप्ट जोडून तो अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. त्यासोबत औसा ( जि. लातूर) येथील सभेचे आयोगाने केलेले व्हिडीओ फुटेज देखील पाठवले आहे. सभेचा व्हिडीओ देखील आचारसंहिता भंगाच्या कारवाईसाठी पुरेसा असल्यानं या हाय प्रोफाईल आचारसंहिता भंगाच्या प्रकरणावर आयोग अंतिम निर्णय आयोग काय घेतोय याकडे लक्ष लागले आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.