ETV Bharat / state

CM Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्र्यांनीही घेतलं राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचं दर्शन, म्हणाले... - ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचं दर्शन

CM Eknath Shinde :राज्यात सध्या गणेशोत्सवाचा माहौल पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटी, उद्योगपती यांच्यासोबतच अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणराया विराजमान झालाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानीदेखील गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी शिवतीर्थावर दाखल होत ठाकरेंच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलंय.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 9:14 PM IST

मुख्यमंत्र्यांनी घेतलंय ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचं दर्शन

मुंबई CM Eknath Shinde : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या शिवतीर्थावर गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. नुकतंच मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील गणपतीचे दर्शन घेतलंय. त्यानंतर बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर पोहोचत बाप्पाचं दर्शन घेतलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केलं. यावेळी पुत्र अमित आणि मनसे नेते नितीन सरदेसाई आणि ठाकरे कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित राहिले. (Ganeshotsav 2023)

गणपती बाप्पाला घातलं साकडं : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, सगळ्याच गणपती बापाच्या दर्शनाला तुम्ही राजकीयदृष्टीनं पाहिलं नाही तर बरं होईल. दरवर्षी गणपती उत्सव काळात येथे दर्शनासाठी येत असतो. दर्शनासाठी राज ठाकरे मला बोलवितात. मीदेखील त्यांना बोलावित असतो. दिवाळी सणालाही आम्ही एकमेकांना आमंत्रण देत असतो, असंही शिंदे म्हणाले. कोणत्याही प्रकारे राजकीय चर्चा झाली नाही. फक्त गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलोय. बाप्पाला कालच साकडं घातलंय. राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजावरील संकट दूर होवो. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात चांगला पाऊस पडतोय, असंदेखील ते म्हणाले. (Eknath Shinde visit Ganapati at Shivtirth)

विघ्न दूर होऊ दे : देशावरील, राज्यावरील, शेतकऱ्यांवरील आणि सामान्य जनतेवरील विघ्न दूर होईल, असा मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केलाय. मोदी सरकार संसदेत महिला आरक्षण विधेयक आणत आहे. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतहासिक पाऊल उचललंय. अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी हिम्मत लागते. आपल्यामुळे राजकीय नेत्यांना जनतेत आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागत असल्याचं म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लावला आहे. यामुळं निश्चित सामान्य जनतेचा फायदा होणार मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. Eknath Shinde : सिंहाशी लढण्यासाठी शेळ्या-मेंढ्या एकत्र येऊ शकत नाही, एकनाथ शिंदे विरोधकांवर बरसले
  2. Eknath Shinde to visit Germany : विरोधकांच्या सततच्या टीकेनंतर 'या' कारणानं मुख्यमंत्री करणार जर्मनीचा दौरा
  3. Big Blow to CM Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; 'या' नेत्यानं दिला पदाचा राजीनामा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.