ETV Bharat / state

गँगस्टर एजाज लकडावाला याच्या खास हस्तकाला अटक

कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांच्या खंडणी पथकाने अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने नदीम लकडावाला याला अटक केली आहे.

गँगस्टर एजाज लकडावाला याच्या खास हस्तकाला अटक
गँगस्टर एजाज लकडावाला याच्या खास हस्तकाला अटक
author img

By

Published : Mar 3, 2020, 6:04 AM IST

मुंबई - कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांच्या खंडणी पथकाने अटक केल्यानंतर लकडावालाच्या मुंबईतील खंडणी वसुली करणाऱ्या हस्तकांचे नेटवर्क एकामागून एक उध्वस्त करण्यास मुंबई पोलिसांनी सुरुवात केली आहे. या आगोदर लकडावाला ह्याचे खास हस्तक म्हणून ओळखले जाणारे सलीम महाराज व तारिक परवीन या दोघांना अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने नदीम लकडावाला याला अटक केली आहे.

गँगस्टर एजाज लकडावाला याच्या खास हस्तकाला अटक

नदीम लकडावाला हा एजाज लकडावाला याचा आतेभाऊ असून गेल्या बऱ्याच वर्षापासून तो मुंबईतील बड्या उद्योजकांची माहिती एजाज लकडावाला याला पोहचवत होता. एजाज लकडावाला याला माहिती पुरविल्यानंतर नदीम हा स्वतः दुबईला जाऊन एजाज लकडावाला व पीडित व्यक्तीशी फोनवर संवाद साधून देऊन खंडणीसाठी मध्यस्थीची भूमिका पार पाडत होता. खंडणीमधून मिळालेला पैसा हा नदीम हवालामार्फत दुबईला पाठवून पुन्हा मुंबईत हवालामार्फत आणून इथल्या व्यवसायात गुंतवत होता. नदीम लकडावाला हा एजाज लकडावालाच्या टोळीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांना सामिल करण्याचे काम करत होता. मात्र, आजपर्यंत कोणालाही याबद्दल माहिती मिळत नव्हती. कारण मुंबईतील खार परिसरात राहणाऱ्या नदीम लकडावला याने त्याची ओळख एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समोर आणली होती.

हेही वाचा - प्लास्टिक बंदी: मुंबईत १०२८ किलो प्लास्टिक जप्त, ३ लाख ७५ हजारांचा दंड वसूल

एजाज लकडावला याच्या अटकेनंतर नदीम हा आखाती देशात फरार झाला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस काढल्यानंतर त्यास सौदी अरेबिया येथून मुंबई विमनतळावर आल्यावर अटक करण्यात आली. दरम्यान नदीम लकडावाला यास 3 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा - धनगर आरक्षण; विषय सोडवण्यासाठी केंद्राकडे प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.