ETV Bharat / state

Kian Bhatt : आठ वर्षाच्या कियान भट्टने रचला इतिहास; ३१ मिनिटे आणि ३८ सेकंद तबला वादन - आठ वर्षाच्या कियान भट्टने रचला इतिहास

मुंबईतील आठ वर्षाच्या कियान भट्टने सलग ३१ मिनिटे आणि ३८ सेकंद तबला वादन करत इतिहास रचला ( Eight year old Kian Bhatt made history )आहे. त्याने मुलांच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.

Kian Bhatt
कियान भट्टने रचला इतिहास
author img

By

Published : Nov 13, 2022, 3:00 PM IST

मुंबई : मुंबईतील आठ वर्षाच्या कियान भट्टने सलग ३१ मिनिटे आणि ३८ सेकंद तबला वादन करत इतिहास रचला ( Eight year old Kian Bhatt made history )आहे. त्याने मुलांच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. विशेष म्हणजे कियानचे आजोबा कांती भट हे स्वतः गायक असून विविध आर्केस्ट्रामध्ये ते गात असतात व कधीकधी कियानची तबल्यावर त्यांच्याबरोबर जुगलबंदी सुद्धा रंगते.

कियान भट्ट

तबला शिकवायला कोणी तयार नव्हतं : मुंबईत, कांदिवली येथे राहणाऱ्या व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आंतरराष्ट्रीय स्कूल, बोरवली येथे शिकणाऱ्या आठ वर्षीय कियान समीर भट याने सलग ३१ मिनिटे आणि ३८ सेकंद तबलावादन ( thirty one minutes and thirty eight seconds )करत मुलांच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. कियानला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. वास्तविक याविषयी बोलताना कियान सांगतो की, त्याला संगीताची आवड होती, पण तबला वाजवायची आवड नंतर निर्माण झाली. वयाच्या साडेचार वर्षांपासून त्यांने तबला वाजवायला सुरुवात केली. परंतु जेव्हा त्याचे वडील त्याच्यासाठी तबलावादनासाठी कोच किंवा एखादी शाळा शोधत होते तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की वयाची आठ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्याला कुठेही तबला वाजवता येणार नाही. परंतु कियान ला विशाल मेहेर नावाने एक प्रशिक्षक भेटले व त्यांनी कियान ला घडवायला सुरुवात केली. वयाच्या साडेचार वर्षापासून ८ वर्षापर्यंत म्हणजे साडेतीन वर्षांमध्ये कियान ने एक इतिहास रचला.

नातू व आजोबा यांच्यामध्ये जुगलबंदी : कियानचे आजोबा कांती भट हे गायक आहेत. पण त्यांनी कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेले नाही. त्याने अनेक लाइव्ह शोमध्ये गाणी गायली आहेत. कियान ला आजोबा बरोबर ते गात असताना तबला वाजवायला फार आवडतं. कधी कधी नातू व आजोबा यांच्यामध्ये तबलावादनावरून जुगलबंदी सुद्धा रंगते. कियान सांगतो की त्याला असं काही विशेष नाही आहे की, तो फक्त तबलाच वाजवणार. परंतु त्याला संगीतामध्येच फार आवड आहे. संगीतातले विविध प्रकार त्याला शिकायचे आहेत. परंतु त्याबरोबर त्याला अभ्यासावर सुद्धा लक्ष केंद्रित करायचं आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम करताना तो अधिक काळही तबला वाजवू शकला असता, असेही तो म्हणाला.

कियानला रियाज आवडतो : कियानचे वडील समीर भट्ट सांगतात की, कियान ला संगीताची पार्श्वभूमी नव्हती. ते एका कौटुंबिक मित्राची मदत घेतात. व्यवसायाने ढोलकी वाजवणारे जे आहेत त्यांनी आग्रह धरला की त्यांनी कियानला प्रथम तबला शिकवाव. म्हणून कियान ला तबला शिकवायला सुरुवात केली. कियानची आई मनीषा भट सांगतात की, आतापर्यंत तो अभ्यास आणि सराव सत्रांमध्ये समतोल साधू शकला आहे. तो सकाळी तबल्याचा सराव करतो आणि संध्याकाळी अभ्यास पूर्ण करतो. कियानला त्याचा रियाज आवडतो आणि त्याला वेगवेगळी गाणी प्रयोग करायला आवडतात. कियान ची मोठी बहीण जशवी ही आठवी मध्ये शिकत असून बॅटमिंटन खेळात तिची जास्त रुची असून ती उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.