श्रीनगर : देशभरात आज ईद उल फित्र मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे. काश्मीर खोऱ्यातील मुस्लीम बांधवही मोठ्या उत्साहात ईद उल फित्र साजरी करत आहेत. काश्मीर खोऱ्यातील लहान मोठ्या मशीदीसह इदगाह मैदानावरही मोठ्या संख्येने नागरिक ईद उल फित्र साजरी करत आहोत. त्यासह देशाच्या आर्थिक राजधानीतही मोठ्या प्रमाणात ईद उल फित्र साजरी करण्यात येत आहे. सकाळपासूनच मुस्लीम बांधव मुंबईतील विविध मशीदीत ईदचा नमाज अदा करत आहेत.
-
#WATCH | People throng market places in Mumbai ahead of #EidAlFitr; earlier visuals from Mohammed Ali Road pic.twitter.com/MKvnEl9qA3
— ANI (@ANI) April 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | People throng market places in Mumbai ahead of #EidAlFitr; earlier visuals from Mohammed Ali Road pic.twitter.com/MKvnEl9qA3
— ANI (@ANI) April 21, 2023#WATCH | People throng market places in Mumbai ahead of #EidAlFitr; earlier visuals from Mohammed Ali Road pic.twitter.com/MKvnEl9qA3
— ANI (@ANI) April 21, 2023
काश्मीरच्या खोऱ्यात शांतता नांदण्यासाठी प्रार्थना : काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव राहतात. त्यांनी सकाळीच ईद उल फित्रनिमित्त मशीदीत नमाज अदा केला. यावेळी काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी यासाठी मुस्लीम बांधवांकडून अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. श्रीनगरच्या मुख्य जामा मशीदीतही ईदचा नमाज अदा करण्यात आला असून यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवांची उपस्थिती होती.
-
रमजानच्या पवित्र महिन्यात प्रार्थना, उपवास आणि दानपुण्याच्या माध्यमातून अंतर्मन शुद्धीला महत्व दिले गेले आहे.
— Governor of Maharashtra (@maha_governor) April 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो व परस्पर बंधुभाव वृद्धिंगत करो अशी प्रार्थना करतो. सर्वांना 'ईद मुबारक' 🙏🏻
">रमजानच्या पवित्र महिन्यात प्रार्थना, उपवास आणि दानपुण्याच्या माध्यमातून अंतर्मन शुद्धीला महत्व दिले गेले आहे.
— Governor of Maharashtra (@maha_governor) April 22, 2023
ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो व परस्पर बंधुभाव वृद्धिंगत करो अशी प्रार्थना करतो. सर्वांना 'ईद मुबारक' 🙏🏻रमजानच्या पवित्र महिन्यात प्रार्थना, उपवास आणि दानपुण्याच्या माध्यमातून अंतर्मन शुद्धीला महत्व दिले गेले आहे.
— Governor of Maharashtra (@maha_governor) April 22, 2023
ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो व परस्पर बंधुभाव वृद्धिंगत करो अशी प्रार्थना करतो. सर्वांना 'ईद मुबारक' 🙏🏻
काश्मीर खोऱ्यात सुरू आहे उत्साह : काश्मीर खोऱ्यातील लहान मोठ्या मशीदीत सकाळपासून ईद उल फित्रचा उत्साह आहे. काश्मीर खोरे सकाळपासून अल्लाहू अकबरच्या नादांनी दुमदुमले आहे. काश्मीर खोऱ्यातील अतहर शरीफ दर्गाह हजरत बिल श्रीनगर येथे नमाज आयोजित करण्यात आला आहे. जम्मू परिसरातील सर्वात मोठ्या जामा मशीदमध्येही नमाजचा मोठा उत्साह आहे. दर्गा हजरत बिल येथे सकाळी 10 वाजता ईद उल फित्रची नमाज अदा करण्यात येणार आहे.
मुंबईतही ईद उल फित्रचा मोठा उत्साह : देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही मोठ्या प्रमाणात ईद उल फित्र साजरी करण्यात येत आहे. ईद उल फित्रला मुस्लीम बांधवांनी सकाळीच नमाज अदा केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी चंद्र दर्शन झाल्यानंतर ईदची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे देशभरात ईदचा उत्साह सुरू आहे. मुंबईतील माहिम दर्ग्यात ईद साजरी करण्यासाठी मुस्लीम बांधव एकत्र आले आहेत. त्यासह मदनपुरा येथील मैदानावरही मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली आहे.
राज्यपालांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा : रमजान महिन्याच्या पवित्र सणानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. आत्मकल्याणातून विश्वकल्याणाचा प्रशस्त मार्ग दाखवणारा हा महिना आहे. ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो व परस्पर बंधुभाव वृद्धिंगत करो अशी प्रार्थना करतो. सर्वांना, ईद मुबारक असे राज्यपाल रमेश बैस यांनी दिलेल्या शुभेच्छात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा - Chardham Yatra 2023: चारधाम यात्रा सुरू; अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडणार