ETV Bharat / state

Patra Chawal Scam : संजय राऊत यांच्या जामीनाला ईडीचे आव्हान, आज उच्च न्यायालयात याचिकेवर होणार सुनावणी - Patra Chawal financial misappropriation

संजय राऊत यांच्या जामीनावर ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मुंबईतील पत्रा चाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सत्र न्यायालयाने संजय राऊत यांनी जामीन मिळाला होता.

ईडीच्या आव्हान याचिकेवर सुनावणी
ईडीच्या आव्हान याचिकेवर सुनावणी
author img

By

Published : Jun 15, 2023, 11:35 AM IST

मुंबई : बहुचर्चित पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारच्या प्रकरणात जामीनावर बाहेर असलेल्या संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांनी या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. या जामीनाला ईडीकडून आव्हान देण्यात आले असून आज मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी होणार आहे. जर उच्च न्यायालयाने ईडीची मागणी मान्य केली तर संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर आहे. त्याप्रकरणी त्यांना अटकदेखील झाली होती. काही महिने ते भायखळाच्या तुरुंगामध्ये होते. मात्र त्यांच्या वकिलांनी बाजू मांडल्यानंतर सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांनी संजय राऊत यांचा गुणवत्तेच्या आधारे जामीनाचा अर्ज मान्य करत त्यांना जामीन दिला होता. या जामीन मिळाल्याच्या काही दिवसानंतर अंमलबजावणी संचलनालयाने ज्येष्ठ अधिवक्ता अनिल सिंग यांच्यामार्फत या जामीन अर्जाला आव्हान दिले. मात्र या आव्हान याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी अद्यापही नियमित पद्धतीने सुरू झालेली नाही. आज त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल.

सुनावणीसाठी वकिलांचा प्रश्न : ईडीच्या या आव्हान याचिकेवर मागे एकदा उच्च न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली होती. पण न्यायालयाने कामामुळे सुनावणी तहकूब केली होती. यावर ईडीच्या अधिवक्तांनी प्रश्न केला होता.

जामीन अर्जाला आम्ही आव्हान दिलेले आहे. यावर सुनावणी कधी होणार? अंमलबजावणी संचलनालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता अनिल सिंग.

दरम्यान अधिवक्तांच्या या प्रश्नावर उत्तर देताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई म्हणाले की,

" आपण पाहत आहात की कामांचा किती मोठा खटल्यांचा ढीग पडलेला आहे. न्यायालयीन कामकाजामुळे ही सुनावणी येथे तहकूब करीत 15 जून रोजी पुढील सुनावणी होईल " असे न्यायमूर्तींनी मागील सुनावणीनंतर निर्देश दिले होते.

हेही वाचा-

  1. Sanjay Raut News: संजय राऊत यांच्या रडारवर शिंदे गटासह भाजपचे तीन नेते निशाण्यावर, लवकरच ईडीकडे करणार तक्रार
  2. Sanjay Raut News: बाळासाहेबांचे वारसदार म्हणणाऱ्यांनी मोदींचा फोटो टाकला, पण..संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
  3. Sanjay Raut On Cm : संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, चार मंत्र्यांची गच्छंती होणार असल्याचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.