ETV Bharat / state

Ed's action : मंत्री नवाब मलिकांची मालमत्ता जप्त - properties belonging to Nawab Malik

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (Money Laundering Prevention Act) 2002 अंतर्गत महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांच्या मालकीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

नवाब मलिक
नवाब मलिक
author img

By

Published : Apr 13, 2022, 3:16 PM IST

Updated : Apr 13, 2022, 8:00 PM IST

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 अंतर्गत महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. नवाब मलिक यांना संपत्ती मधून 11.70 कोटी रुपये मिळत होते. मलिकांच्या मुंबई, उस्मानाबाद येथील मालमत्तांवर टाच आली आहे. यात गोवाला कंपाऊंड, कुर्ला, मुंबई येथील व्यावसायिक युनिट, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतजमीन क्षेत्रफळ ५९.८१ हेक्टर (एकूण क्षेत्र १४७.७९४ एकर) मुंबईतील तीन फ्लॅट तसेच वांद्रे पश्चिम, मुंबई येथे दोन निवासी सदनिका आदिंचा समावेश आहे.

ईडीने न्यायालयात काय दावा केला होता ? : ईडीने मलिक यांना सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी ईडीच्या वतीने अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंह यांनी बाजू मांडली. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. त्याची अनेक ठिकाणी बेकायदा संपत्ती असून 3 फेब्रुवारीला दाऊदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हसिना पारकरच्या माध्यमातून दाऊद भारतातील व्यवहार करायचा. तिच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संपत्ती गोळा करण्यात आली. हसिना पारकर आणि नवाब मलिक यांच्यात आर्थिक संबंध असून, तिच्याशी संबंधित मालमत्ता नवाब मलिक यांनी खरेदी केली. कुर्ला येथील मालमत्ता ही दाऊदच्या हस्तकांशी संबंधित होती. ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात आहे.

दाऊदच्या मालमत्तांशी संबंधित व्यवहार- दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या मालमत्तेचे नवाब मलिक हे मालक आहेत. दाऊद टोळीशी संबंधित मालमत्ता हसिना पारकरचा चालक सलीम पटेल याच्याकडून मलिक कुटुंबियांनी खरेदी केली. त्यामुळे हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराचे असल्याचा दावा ईडीने केला आहे. दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत 300 कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा मुख्य आरोप आहे.

हेही वाचा : Kirit Somaiya : ठाकरे सरकारच्या 'डर्टी डझन'ला शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच राहील : किरीट सोमय्या

Last Updated : Apr 13, 2022, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.