ETV Bharat / state

अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीचे समन्स - अनिल परब ईडी चौकशी

गेल्या जूनमध्ये महाराष्ट्राचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांची सहा तासांपासून ते 10 तासांपर्यंत तीन दिवस चौकशी करण्यात आली होती. हे प्रकरण महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात रिसॉर्टच्या बांधकामात कोस्टल रेग्युलेशन झोनच्या तरतुदींच्या कथित उल्लंघनाशी संबंधित मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. ईडीने राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना १५ जून रोजी मुंबईत चौकशीसाठी बोलावले होते.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 27, 2022, 10:10 AM IST

Updated : Nov 27, 2022, 10:53 AM IST

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे माजी मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना मनी लाँडेरिंगप्रकरणी ईडीने समन्स बजावले आहे. पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी सदानंद कदम यांना बोलवण्यात आले आहे

गेल्या जूनमध्ये महाराष्ट्राचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांची सहा तासांपासून ते 10 तासांपर्यंत तीन दिवस चौकशी करण्यात आली होती. हे प्रकरण महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात रिसॉर्टच्या बांधकामात कोस्टल रेग्युलेशन झोनच्या तरतुदींच्या कथित उल्लंघनाशी संबंधित मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. ईडीने राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना १५ जून रोजी मुंबईत चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने परब यांना पाठवलेल्या समन्समध्ये म्हटले होते की, त्यांना मनी लाँडरिंग विरोधी कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करायची आहे आणि त्यांचे म्हणणे नोंदवायचे आहे.

नोंदणीकृत जमीन सदानंद कदम यांना विकल्याची माहिती उघड माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी दापोलीत परब यांनी बांधलेल्या बेकायदा रिसॉर्टबाबत अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याचवेळी, गेल्या मार्चमध्ये प्राप्तिकर विभागानेही यासंदर्भात छापे टाकले होते. ज्यामध्ये विभागाला काही कागदपत्रे मिळाली. त्यानुसार परब यांनी 2017 मध्ये दापोली येथे एक कोटी रुपयांना जमीन खरेदी केली होती. त्यानंतर 2019 मध्ये नोंदणीकृत जमीन सदानंद कदम यांना 2020 मध्ये 1.10 कोटींना विकली असल्याची माहिती उघड झाली. रिसॉर्टच्याच उभारणीसाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च झाल्याचा आयकराचा अंदाज आहे. ईडीने यापूर्वी शिवसेना नेते सदानंद कदम आणि संजय कदम यांचीही चौकशी केली आहे.

अनिल परब यांच्यावर काय आहे आरोप ? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सुरू असलेल्या मनी लाँड्रिग प्रकरणात चौकशी करण्यासाठी अनिल परब यांनाही ईडीने समन्स पाठविण्यात आले होते. मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात अनिल परब यांना 20 कोटी रूपये मिळाल्याचा आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने केला होता. त्यासंबंधी ईडीने अनिल परब यांची चौकशी केली.

परबांविरोधात 'ईडी'कडे तीन तक्रारी'ईडी'कडे मंत्री परब यांच्याविरुद्ध सध्या तीन वेगवेगळ्या प्रकरणाच्या तक्रारी आहेत. त्यामध्ये मुंबई पोलिसांचे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून त्यांच्याबद्दल केलेला उल्लेख, त्याचप्रमाणे परिवहन विभागातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अधिकाऱ्याने दिलेली तक्रार आणि दापोली येथील मालमत्ता व अवैध परवाने, बांधकामाबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारींचा समावेश आहे.

Last Updated : Nov 27, 2022, 10:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.