ETV Bharat / state

ED Raid on Bollywood Production : महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी बॉलिवूड प्रॉडक्शन हाऊसमध्ये ईडीची मोठी छापेमारी; बॉलिवूड विश्वात खळबळ - mahadev betting scam

ED Raid on Bollywood Production : महादेव बेटिंग ॲपप्रकरणाचा तपास ईडीनं सुरू केल्यामुळं पूर्ण बॉलिवूड विश्वात खळबळ उडाली आहे. अशातच आता ईडीनं आणखी एक मोठं पाऊल उचललंय.

ED Raid on Bollywood Production
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 7:35 AM IST

Updated : Oct 7, 2023, 8:58 AM IST

मुंबई ED Raid on Bollywood Production : महादेव बेटिंग ॲपप्रकरणी ईडीची कारवाई सुरूच आहे. याप्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयानं मोठी कारवाई केलीय. महादेव बेटिंग ॲपप्रकरणी ईडीनं एका मोठ्या बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापा टाकलाय. महादेव बेटिंग ॲपप्रकरणी ईडीनं मध्यरात्री बॉलिवूडच्या एका मोठ्या प्रॉडक्शनच्या आवारात आणि अंधेरीतील इतर पाच ठिकाणी छापे टाकले आहेत.

बॉलिवूडमध्ये एकच खळबळ : ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रॉडक्शनला एक चित्रपट बनवण्यासाठी महादेव ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून फायनान्स मिळाला होता. हे प्रॉडक्शन्स एका टॉप बॉलीवूड स्टारला घेऊन बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट बनवत आहे. हा चित्रपट प्रादेशिक भाषेत बनवला जात असून तो इतर अनेक भाषांमध्ये डब केला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. नुकतंच ईडीनं अभिनेता रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, कपिल शर्मासहीत अनेक बॉलिवूडच्या कलाकारांना समन्स बजावलं होत. तर काही कलाकार अजूनही ईडीच्या रडारवर आहेत. या सेलिब्रिटींची चौकशी होणार असल्यानं बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली असतानाच आता बॉलिवूडकरांची झोप उडवून देणारी बातमी समोर आलीय.

अनेक बॉलिवूड स्टार्स ईडीच्या राडारावर : मागील वर्षी 18 सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन आणि सक्सेस पार्टीत सहभागी झालेल्या बहुतांश कलाकारांची नावं आता समोर आली आहेत. या पार्टीत सहभागी झालेल्या एका युट्युब इन्फ्लुएंसरनं आपल्या स्वतःचा युट्युब अकाऊंटवरुन साधारणतः एक वर्षापूर्वी एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्या व्हिडीओचं आता विश्लेषण केलं जाणार असून अनेक बॉलिवूड कलाकार या पार्टीत सहभागी झाल्याचं त्या व्हिडिओमधून दिसून येतय. व्हिडिओत जे बॉलिवूड स्टार्स दिसत आहेत, ते सर्व सध्या ईडीच्या रडारावर आहेत. मागील काही दिवसांत सक्सेस पार्टीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यात सौरव चंद्राकार याच्या लग्नापासून तर बर्थडे पार्टी आणि सक्सेस पार्टीमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांना पैसेही मिळाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Ranbir Kapoor: महादेव ॲप घोटाळा प्रकरण; रणबीर कपूरने ईडीकडे मागितला 2 आठवड्याचा वाढीव वेळ
  2. ED Action On Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरला ईडीने पाठवले समन्स, ६ ऑक्टोबरला हजर राहण्याचे निर्देश
  3. Mahadev App scam : ईडीची मोठी कारवाई, सनी लियॉनसह टायगर ईडीच्या पिंजऱ्यात? मुंबईबरोबर अनेक ठिकाणी छापे

Last Updated : Oct 7, 2023, 8:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.